loader
Breaking News
Breaking News
Foto

मुरुड राजपुरी रस्त्यावरील झाडाझुडपे अपघाताला आमंत्रण ! साईडपट्या दिसत नसल्याने अपघाताची भिती

कोर्लई,ता.२२(राजीव नेवासेकर)मुरुड-राजपुरी-जंजिरा किल्ला रस्त्यावर पावसाळ्यापासून एकदरा ते डोंगरी राजपुरी दरम्यान आडवळणाच्या रस्त्यावर झाडा-झुडपांच्या असलेल्या विळख्यामुळे,साईड पट्ट्या दिसत नसल्याने अपघाताची भिती व्यक्त होत असुन याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या असलेल्या दुर्लक्षा बाबत पर्यटक, स्थानिक वाहन चालक व प्रवासीवर्गातून नाराजी व्यक्त होत आहे. मुरुड-राजपुरी जंजिरा किल्ला रस्त्यावर सातत्याने वाहनांची वर्दळ असुन गेल्या कित्येक महिन्यांपासुन मुरुड- एकदरा-डोंगरी-राजपुरी-जंजिरा किल्ला दरम्यान आडवळणाच्या रस्त्यालगत वाढलेल्या झाडा-झुडपांमुळे साईडपट्ट्या दिसत नसल्यामुळे वाहन चालकांना वाहन चालविण्यात कसरत करावी लागत असुन वेळप्रसंगी अपघाताची भिती व्यक्त होत आहे. शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकारी वर्गाने यात तातडीने लक्ष पुरवन मुरुड-राजपुरी रस्त्यावर असलेला झाडा-झुडपांचा विळखा तातडीने हटविण्यात यावा. अशी मागणी पर्यटकांमधून वाहन-चालक व प्रवासीवर्गातून जोर घरीत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg