loader
Breaking News
Breaking News
Foto

आमदार शेखर निकम यांची वचनपूर्ती, पाणी प्रश्न गंभीर तिथे शेखर सर खंबीर

संगमेश्वर (सत्यवान विचारे) - संगमेश्वर तालुक्यातील पाताडेवाडी व मनवेवाडी येथे पाणी प्रश्न खूप मोठा होता. उन्हाळा सुरू झाला की ग्रामस्थांना वणवण करावी लागत होती. हा प्रश्न आमदार शेखर निकम यांच्याकडे मांडल्यावर तात्काळ बोअरवेल मारण्याचे वचन दिले व ते पूर्ण देखील केले. 3 बोअरवेल पूर्ण करून जवळपास 3 वाड्याचा पाण्याचा प्रश्न सोडवला. यामध्ये भाजप तालुका चिटणीस राकेश जाधव यांचे विशेष सहकार्य लाभले. यांचे उद्घाटन अनिरुद्ध निकम यांच्या हस्ते देवदिवाळी निमित्त करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच ग्रामस्थांना प्रवासी थांबा नसल्याने सरांच्या सूचनेनुसार माजी उपसरपंच राम शिंदे यांनी आकर्षक प्रवासी थांबा बांधुन दिला व त्याचे लोकार्पण देखील करण्यात आले. गणेश मंडळ पाताडेवाडी यांच्या वतीने ढोल ताशांच्या गजरात सर्वांचे स्वागत करण्यात आले. तसेच अनिरुद्ध निकम, राम शिंदे व राकेश जाधव यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना अनिरुद्ध निकम यांनी शेखर सरांनी तालुक्यात पाण्यासाठी केलेल्या कामाची माहिती दिली तसेच इतर विकास कामांचा आढावा घेऊन मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. ग्रामस्थांमध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg