loader
Breaking News
Breaking News
Foto

श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक संघाची आज सभा

रत्नागिरी - श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक संघाची सभा आज शनि. दि. २२ नोव्हें. २०२५ रोजी सायं. ठिक ४ वा. श्रीराम मंदिर सभागृह, श्रीराम आळी, रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आली असून या सभेला सर्व ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनींनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे. श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक संघातर्फे ज्येष्ठ बंधू भगिनींसाठी विविध कार्यक्रम व उपक्रम आयोजित करण्यात येतात. यावर्षी पावसाळा सतत चालू होता त्यामुळे ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनींना भर पावसात घराबाहेर पडणे त्रासदायक होते. म्हणून त्या काळात कार्यक्रम आयोजित करता आले नाहीत. त्यानंतर दिवाळी सण होता, आता पावसाळा व दिवाळी सण आटोपल्याने ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यक्रमांना प्रारंभ झाला असल्याचे श्री. नित्यानंद दळवी यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक संघाची सभा आज शनि. दि. २२ नोव्हें. २०२५ रोजी सायं. ठिक ४ वा. श्रीराम मंदिर सभागृह, श्रीराम आळी, रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आली आहे. यावेळी नामवंत तज्ज्ञांना मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करण्यात आल्याचे सांगण्यात आले. यावेळी अ. भा. कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. चंद्रमोहन देसाई हे उपस्थित राहून ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनींना ‘‘आनंदी जीवनाचा मार्ग’’ या विषयावर उद्बोधक मार्गदर्शन करतील. तसेच नामवंत डॉ. सचिन पवार हे यावेळी ज्येष्ठ बंधू भगिनींना भेडसावणार्‍या विविध आजारांवर उपयुक्त टिप्स देतील. तसेच ज्येष्ठ नागरिकांना वारंवार होणारे आजार व त्यावर घ्यावयाची काळजी या विषयावर ते मार्गदर्शन करतील.

टाइम्स स्पेशल

यावेळी ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनींचे वाढदिवस जाहीर कार्यक्रमात साजरे करण्यात येतील. त्या सर्वांच्या हस्ते श्रीराम दरबारात पूजा करण्यात येईल व त्यांना उत्तम आयुरारोग्य लाभावे यासाठी प्रभू श्रीरामाला साकडे घालण्यात येणार आहे. वाढदिवस असणार्‍या ज्येष्ठ मंडळींना यावेळी शुभेच्छा पत्रे देण्यात येतील. ज्येष्ठ मंडळींचा वेळ आनंदात जावा यासाठी हा कार्यक्रम उपयुक्त ठरत असल्याचे सांगण्यात येते. या सभेला रत्नागिरी परिसरातील व तालुक्यातील सर्व ज्येष्ठ बंधू भगिनींनी आवर्जून उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद लुटावा तसेच अल्पोपहाराचा आस्वाद घ्यावा असे आवाहन श्रीराम ज्येष्ठ नागरिक संघातर्फे करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg