loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडमध्ये भाजप उमेदवाराचे बंडाचे निशाण

खेड (प्रतिनिधी) - खेड नगरपरिषद निवडणुकीसाठीच्या नगरसेवकपदासाठी माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या समर्थक उमेदवारांनी दाखल केलेले अर्ज मागे घेत पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानला असला तरी भाजपचे तालुका सरचिटणीस भूषण काणे यांनी मात्र उमेदवारी अर्ज कायम ठेवत बंडाचे निशाण फडकावले आहे. प्रभाग ६ ब मधून ते निवडणूक रिंगणात राहिले आहेत. शिवसेना-भाजप महायुतीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतरही चलबिचल झालेल्या भाजपच्या नाराज उमेदवारांनी थेट अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले होते. तालुका सरचिटणीस भूषण काणे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल करत पक्ष नेतृत्वाला आव्हान दिले होते. सुरुवातीपासूनच उमेदवारीवर ठाम राहत पक्ष पदाचा राजीनामा देण्याची तयारी ठेवली होती. भाजपच्या वरिष्ठांकडून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्नही सुरू होते. मात्र या प्रयत्नांना अखेर अपयश आले. काणे यांनी प्रभाग ६ मधून दाखल केलेला अर्ज कायम ठेवत बंडाचे निशाण फडकावले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg