दापोली - आंजर्ले सारख्या निसर्गरम्य गावात पर्यटनाला चालना मिळत असतानाच तेथील ग्रामस्थांना आर्थिक सक्षम बनविण्याचा दृष्टीकोनातून त्याचबरोबर पर्यटन विकासाला चालना मिळावी हा हेतू ठेवून भंडारी हितवर्धक ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेने आंजर्ले गावात नवीन शाखा उघडून पंचक्रोशीतील ग्राहकांसाठी मदतीचे मोठे पाऊल उचलले असल्याचे मत आंजर्ले सरपंच सौ. मेघना पवार यांनी व्यक्त केले. आंजर्ले येथे भंडारी हितवर्धक ग्रामीण पतसंस्थेच्या नुतन शाखेचे उद्घाटन आंजर्ले सरपंच सौ. मेघना पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर पतसंस्थेचे अध्यक्ष सचिन तोडणकर, बँक ऑफ इंडिया शाखा आंजर्लेचे व्यवस्थापक सौरभ मांडगे, आंजर्ले उपसरपंच प्रथमेश केळसकर, ज्येष्ठ व्यापारी मदन जैन, श्री देव विठ्ठल मंदिर आंजर्ले चे अध्यक्ष श्री. बाळभाऊ केळसकर, पतसंस्थेचे उपाध्यक्ष अमोल नरवणकर, संचालक प्रेमानंद महाकाळ, शशिकांत वराडकर, नितीन मयेकर, अभय गोयथळे, राजेश्वर सुर्वे, जितेंद्र जाधव, केतन वणकर, कृष्णकुमार बुटाला, सुवर्णा मयेकर, ज्योती नागवेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग भाटकर आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आपल्या प्रस्तावना मध्ये पतसंस्थेचे उपाध्यक्ष अमोल नरवणकर म्हणाले की, भंडारी हितवर्धक पतसंस्थेने गेल्या 29 वर्षात सभासदांना आर्थिक सक्षम करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. यामुळे संस्थेकडे 17 कोटीच्या ठेवी आहेत. तर कर्ज 13 कोटीचे आहे. पतसंस्थेची गुंतवणूक 6 कोटी असून निव्वळ नफा 27 लाखापेक्षा जास्त आहे. पतसंस्थेने स्थापनेपासून ऑडीट वर्ग अ मिळविला असून सभासदांना 12 टक्के लाभांश दिला आहे. या नंतर श्री देव विठ्ठल मंदिर आंजर्ले चे अध्यक्ष श्री. बाळभाऊ केळसकर यांनी नूतन आंजर्ले शाखेस शुभेच्या दिल्या. तसेच प्रतिष्टीत नागरिक श्री. भाऊ भाटकर यांनी नूतन आंजर्ले शाखेस शुभेच्या दिल्या. यावेळी आंजर्ले सरपंच सो. मेघना पवार म्हणाल्या की, या पतसंस्थेच्या शाखेचा फायदा आंजर्ले पंचक्रोशीतील लोकांना होणार असून त्यामुळे आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होणार आहे. सहकार क्षेत्रात अग्रगण्य व नामवंत मानल्या जाणाऱ्या पतसंस्थेचे सामाजिक कार्यही कौतुकास्पद असून पतसंस्थेचे अध्यक्ष सचिन तोडणकर यांनी लाल केळी संवर्धनासाठी जो पुढाकार घेतला आहे, ते कार्य प्रशंसनीय असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी आपल्या मनोगतात पतसंथेचे अध्यक्ष श्री. सचिन तोडणकर यांनी सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम पतसंस्थेने केले असून दापोलीमध्ये रूग्णोपयोगी साहित्य पेढी सुरू करण्यात आली आहे. अशीच पेढी आंजर्ले गावासाठी सुरू करण्यात आली असून या पेढीच्या माध्यमातून बेड, व्हीलचेअर, कमोड चेअर, फॉल्डींग वॉकर, एअर मेट्रेस, कुबडी, वॉकिंग स्टीक, फॉल्डींग स्टेचर हे साहित्य मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी प्रशांत गुहागरकर 9404765764, प्रथमेश केळसकर 9833722184 यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी उपस्थित सभासदांना व हितचिंतकांना लाल केळीचे रोप भेट देण्यात आले. याबद्दल माहिती देताना संस्थेचे अध्यक्ष सचिन तोडणकर म्हणाले की, लाल केळीचे हे रोप उतीसंवर्धित असून पूर्ण गुच्छ रोगापासून मुक्त असतात. उतीसंवर्धित रोपांची उत्पादन क्षमता ही जास्त असून फळधारणेचा कालावधी हा इतरांपेक्षा कमी असतो. यामध्ये अ जीवनसत्त्व आणि बिटा केरोटिनचे प्रमाण इतर केळी फळापेक्षा जास्त असतो. त्यामुळे त्याला जास्त बाजारभाव मिळतो. संपूर्ण घडाचे वजन 15 ते 16 किलो असे व केळयांची संख्या ही 90 ते 110 इतकी असते. कोकणातील वातावरण हे या लाल केळयांसाठी पोषक असे असून नष्ट होत चाललेले हे वैभव जपण्याचे कार्य आपण करण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाची प्रस्तावना पतसंस्थेचे उपाध्यक्ष अमोल नरवणकर यांनी केली तर सूत्रसंचालन श्री. वैभव बोरकर यांनी केले. आभार जितेंद्र जाधव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भंडारी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पराग भाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाती बोरकर, अपर्णा महाकाळ, दिपक मोरे, रूपेश कोरडे, राकेश महादवे यांनी प्रयत्न केले.






































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.