loader
Breaking News
Breaking News
Foto

थिबा राजाकालीन बुद्ध विहार संबोधन जाहीर सभा

रत्नागिरी - बौद्ध समाज बांधवांची रत्नागिरीत सभा होत आहे. या सभेसंदर्भात समाजात जनजागृती करण्यात आली आहे. त्यामुळे आजची सभा लक्षवेधी ठरणार आहे. बुद्ध विहार संदर्भात ही सभा आहे. थिबा राजाकालीन बुद्ध विहार बांधण्याकरता शासकीय निधी उपलब्ध करण्यासाठी (समाज भवन) हा शब्द कार्यालयीन वापरासाठी वापरण्यात आला असल्याचे पालकमंत्री महोदयांनी जिल्हाधिकारी यांचे समवेत संघर्ष समितीचे पदाधिकारी आणि उपस्थित धम्म बांधवांना सांगूनही त्यांचे समाधान झालेले नाही. तालुक्यातील बौद्ध जनतेला सत्य वस्तुस्थिती समजावून सांगण्यासाठी भीम युवा पँथरचे पदाधिकारी, ट्रस्ट पदाधिकारी तसेच धार्मिक व सामाजिक संघटना यांनी दिनांक २३ नोव्हेंबर २५ रोजी सकाळी ११.०० वाजता सावरकर नाट्यगृह मारुती मंदिर रत्नागिरी येथे संबोधन सभेचे आयोजन केले आहे. या सभेला पालकमंत्री महोदय उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तरी तालुक्यातील व जिल्ह्यातील बौद्ध जनतेने या सभेला उपस्थित राहावे असे आयोजनकांकडून आव्हान करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg