लांजा (संजय साळवी) : उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी २१ नोव्हेंबर रोजी नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदाचे चित्र स्पष्ट झाले आहे. ही निवडणूक विशेष लक्षवेधी ठरणार आहे ती थेट लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी होय. यावेळी नगराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली महायुती जिंकणार? की महाविकास आघाडी, अपक्ष बाजी मारणार? याबाबतचे चित्र बुधवारी ३ डिसेंबर रोजी निकालाच्या दिवशी स्पष्ट होणार आहे. आताची अटीतटीची आणि चुरशीची लढत लक्षात घेता या तिरंगी लढतीमध्ये कोण होणार लांजाचा नगराध्यक्ष? हा लांजावासियांसाठी औत्सुक्याचा विषय ठरला आहे.
लांजा नगरपंचायतीच्या १७ नगरसेवक आणि थेट लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी मंगळवारी २ डिसेंबर रोजी मतदान होत आहे. शुक्रवारी २१ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी नगराध्यक्ष तसेच नगरसेवकपदासाठीच्या लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. नगरपंचायतीच्या १७ पैकी १६ जागा या महायुती लढत असून जवळपास १४ जागांवर महाविकास आघाडी लढत आहे. तर १७ पैकी १७ ही जागांवर अपक्ष लढवणार्या उमेदवारांची संख्या ही सर्वाधिक आहे. नगरपंचायतीचा प्रभाग क्र. ६ म्हणजे देवराई - आगरवाडी या प्रभागातून दरवर्षी याच प्रभागातील नागरिक हे स्वतंत्रपणे आपला अपक्ष नगरसेवक बिनविरोध निवडून देत असतात. त्यामुळे या ठिकाणी कोणताही राजकीय पक्ष आपला उमेदवार देत नाही. गेली दोन टर्म सलग या प्रभागातून आगरवाडी येथील उमेदवार निवडून आलेले आहेत. यावेळी या प्रभाग क्र. ६ मधून देवराईला संधी देण्यात आली आहे. त्यामुळे येथील अपक्ष उमेदवार बिनविरोध निवडून येणार आहे. उर्वरित नगरसेवकपदाच्या १६ ही जागांवर सर्वच राजकीय पक्षांनी आपले उमेदवारी देताना सर्वच्या सर्व जागा जिंकून आणण्याचे दावे केले आहेत. असे असले तरी त्या - त्या प्रभागात असलेल्या अपक्ष उमेदवारांची ताकदही मोठी आहे. गतवेळच्या काही नगरसेवकांनी यावेळी उमेदवारी न मिळाल्याने अपक्षपणे रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाही फटका राजकीय पक्षांच्या उमेदवारांना बसू शकतो हे नाकारून चालणार नाही. तर काही ठिकाणी अपक्ष उमेदवारांनी प्रस्थापित राजकीय उमेदवारांसमोर तगडे आव्हान निर्माण केल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे.
या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून देखील महायुतीला चांगलीच टक्कर दिली जात आहे. यापूर्वी वादग्रस्त ठरलेला डीपी प्लॅन, कोत्रेवाडी डम्पिंग ग्राउंड यासारखे महत्त्वाचे मुद्दे घेवून महाविकास आघाडी या निवडणुकीत उतरली आहे. त्यांचे हे मुद्दे लोकांपर्यंत पोहोचविण्यात ते कितपत यशस्वी ठरतात यावर महाविकास आघाडीचे यश अवलंबून राहणार आहे. नगरसेवक पदाबरोबरच लांजाविसियांचे लक्ष लागून राहिले आहे ते नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे होय. या निवडणुकीत शिवसेना - भाजपा - राष्ट्रवादी कॉंग्रेस या महायुतीकडून सावली सुनील कुरूप या निवडणूक रिंगणात उतरलेल्या आहेत. त्यांची राजकीय पार्श्वभूमी काहीही नसली तरी त्यांच्या मागे त्यांचे पती, माजी नगराध्यक्ष आणि शिवसेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील कुरूप यांची राजकीय ताकद आहे. याशिवाय आमदार किरण सामंत यांचे सुनील कुरूप अत्यंत जवळचे मानले जात असल्याने आमदार किरण सामंत या जागेसाठी आपली पूर्ण ताकद लावणार हे निश्चित मानले जात आहे. प्रचारासाठी लागणारी कार्यकर्त्यांची फळी आमदार किरण सामंत यांच्याकडे असल्याने ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माजी नगरसेविका, गटनेत्या, उपनगराध्यक्ष अशी विविध पदे भूषविलेल्या पूर्वा मंगेश मुळे या नगराध्यक्षपदाच्या रिंगणात उतरलेल्या आहेत. अभ्यासू नगरसेविका आणि क्लीन चेहरा अशी त्यांची ओळख आहे. डीपी प्लॅन, डम्पिंग ग्राउंड यासारखे प्रकल्प रद्द करण्याचा वचननामा त्यांनी जाहीर केलेला आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांच्यासाठी किती झटून काम करणार यावर त्यांच्या विजयाची मदार आहे.




















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.