loader
Breaking News
Breaking News
Foto

राजापूर न.प.मध्ये १० प्रभागांतील २० जागांमध्ये ११ ठिकाणी तिरंगी तर ९ ठिकाणी दुरंगी लढत

राजापूर (वार्ताहर): राजापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी ज्योती सुनिल खटावकर, ऍड. हुस्नबानू निजामुद्दीन खलिफे व श्रुती श्रीकांत ताम्हणकर यांच्यात लढत होणार आहे. तर एकूण १० प्रभागांच्या २० जागांमध्ये अकरा ठिकाणी तिरंगी तर नऊ ठिकाणी दुरंगी लढत होत आहे. दुरंगी लढत होत असलेल्या जागांमध्ये प्रभाग क्र.१ अ मधून समीक्षा सतीश बंडबे, सान्वी सचिन रावण, प्रभाग क्र.२ ब मधून अरबाज इब्राहीम खलिफे, सौरभ संजय खडपे. प्रभाग क्र.५ अ मधून सिध्दांत नाना जाधव व किशोर काशिनाथ जाधव. प्रभाग क्र.५ ब मधून शबाना निसार मुल्ला व सुमैय्या जिलानी काझी. प्रभाग क्र.६ ब मधून जमिर निजाम खलिफे आणि खलील अहमद हसन सय्यद. प्रभाग क्र.७ अ मधून अमीना अशफाक गडकरी, रसिका राजेंद्र कुशे. प्रभाग क्र.७ ब मधून सुलतान शरफुद्दिन ठाकूर, असीम साजिद काझी. प्रभाग क्र.१० मधून सौरभ संदीप पेणकर, नूरमहंमद इस्माईल मुजावर, प्रभाग क्र.१० ब मधून नसीमा दाऊद याहू, साजिया हनीफ काझी असे उमेदवार असणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तिरंगी लढत होणार्‍या ११ जागांमध्ये प्रभाग क्र.२ अ मधून अनिल नारायण कुडाळी, दिलीप दिवाकर चव्हाण आणि जितेंद्र सदानंद करंगुटकर, प्रभाग क्र.२ ब मधून संगीता भिकाजी चव्हाण, सुधा शांताराम चव्हाण, सुयोगा सुनिल जठार. प्रभाग क्र.३अ मधून नेहा प्रमोद तानवडे, आरती गणेश जाधव, विद्या विवेक गुरव. प्रभाग क्र.३ ब मधून विनय सदाशिव गुरव, दीपक विनायक गुरव, विवेक सिताराम गुरव. प्रभाग क्र.४ अ मधून गार्गी गणेश चिपटे, शितल सुनिल पटेल, उर्मिला अमोल बाकाळकर, प्रभाग क्र.४ ब मधून राकेश सुनिल खटावकर, सुभाष शाम बाकाळकर, दिलीप लक्ष्मण अमरे. प्रभाग क्र.६ अ मधून अफरोज महंमद झाली, शीतल शशिकांत रहाटे, निलोफर मुदस्सर मुकादम. प्रभाग क्र.८ अ मधून तनिष्का अजय डंबे, अनामिका सौरभ जाधव, प्रेरणा प्रशांत नार्वेकर. प्रभाग क्र.८ ब मधून श्रीकांत विनायक दुधवडकर, राहूल रमाकांत तांबे, सुशांत दिलीप मराठे. प्रभाग क्र.९ अ मधून रेणूका राजन गुंडये, जानवी गिरीश वादक, नेत्रा निलेश सोगम. प्रभाग क्र.९ ब मधून संजय गणपत ओगले, सुबोध सुभाष पवार, संजय पांडुरंग ओगले असे उमेदवार असणार आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg