संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५-२६ च्या प्राथमिक पहाणी करणे व मार्गदर्शन यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी ( जिल्हापरिषद रत्नागिरी)वैदेही रानडे यांनी कडवई गावाला भेट दिली. या दरम्यान त्यांनी विविध विकासकामे , योजना व प्रकल्प यांची पहाणी करून योग्य मार्गदर्शन केले . यावेळी कडवई ग्रामपंचायत हॉल येथे विविध शासकीय अधिकारी ,कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते . मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५ -२६ साठी कडवई ग्रामपंचायतीने सहभाग नोंदवला आहे. गटविकास अधिकारी आनंद लोकरे व सहायक गटविकासाधिकारी विनोदकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामअधिकारी राहुलकुमार चौधरी यांच्या सहकार्याने कडवई ग्रामपंचायतीच्या वतीने या अभियानातील सर्व कामे पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत .सरपंच विशाखा कुवळेकर व उपसरपंच दत्ताराम ओकटे व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी यांच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे काम सुरू आहे .
सर्व मान्यवराना ग्रामपंचायतिच्या वतीने सन्मानित करण्यात आले . या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन निलेश कुंभार यांनी केले . ग्रामधिकारी राहुलकुमार चौधरी यांनी अहवाल वरीष्ठसमोर सादर केला .यावेळी उपमुख्यकार्यकारी अधिकारी सागर पाटील,सामान्य प्रशासन मुख्यकार्यकारी अधिकारी विजयसिंग जाधव,जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठले,गटविकास अधिकारी आनंद लोकरे,सहायक गटविकास अधिकारी विनोदकुमार शिंदे,महिला बालविकास प्रकल्प अधिकारी मल्लिनाथ कांबळे ,विस्तार अधिकारी एस पी घुले,जे आर पारसे,,पंकज निकम, कृषी अधिकारी परेश सुर्वे, कृषी विस्तार अधिकारी प्रणय भायनाक, पाणीपुरवठा उपभियंता अभि कांबळे,बांधकाम उपअभियंता शिरिषकुमार गायकवाड , सरपंच विशाखा कुवळेकर , उपसरपंच दत्ताराम ओकटे प्रशासकीय अधीकारी ,अंगणवाडी सेविका , बचतगट प्रतिनिधी ,आरोग्य अधिकारी ,ग्रामपंचायत सदस्य ,कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.






































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.