loader
Breaking News
Breaking News
Foto

लवेल येथे भव्य आंतरशालेय विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न

लवेल-खेड (प्रतिनिधी) - आंतरशालेय विज्ञान प्रदर्शन या विज्ञान नगरीच्या उपक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष श्री. गेजगे व चेअरमन तथा सीईओ डॉ शिंगे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रशालेचे प्राचार्य श्री. एच् एम पवार यांनी विज्ञान प्रदर्शनाचे जीवनातील महत्व व विज्ञानाची प्रगती समजावून सांगितले. प्रशालेत वेगवेगळ्या दालनासाठी भारतीय शास्त्रज्ञ डॉ जयंत नारळीकर हॉल, डॉ.होमी भाभा हॉल, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हॉल, डॉ. सी.व्ही.रामण हॉल इ. शास्त्रज्ञांची नांवे दिली होती . विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक कल्पकता, प्रयोगशीलता व नवोन्मेषी विचारांना चालना मिळावी या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले हे प्रदर्शन उत्साह, जिज्ञासा आणि उत्तम नियोजनाने पार पडले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध प्रकारांच्या प्रकल्पामध्ये ऊर्जा बचत, टाकाऊतून टिकाऊ तयार करणे, पर्यावरण संरक्षण, रोबोटिक्स , कृषी क्षेत्रातील तांत्रिक सुधारणा, जलसंधारण, सौरऊर्जा या व अशा अनेक विविध प्रकारच्या मॉडेलमुळे पालकांनी, पाहुण्यांनी, संस्थेने विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे आणि प्रयोगशील वृत्तीचे भरभरून कौतुक केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या विज्ञान प्रदर्शनाला संस्थेचे अध्यक्ष मोहन गेजगे, प्रशालेचे चेअरमन तथा सी.ई.ओ. डॉ. मधुकर शिंगे, व्हाइस चेअरमन ॠषिकेश शिंगे, सल्लागार श्री. के. जी. राजे, कार्याध्यक्ष विठ्ठल गमरे, उपाध्यक्ष अनंत पालकर, गंगाराम गोठल, विष्णू गुंडेकर, दिपक वामणे, खजिनदार सौ. उर्मिला आंब्रे, सरचिटणीस सौ. शोभा शिंगे, सौ. फातिमा घारे, सेक्रेटरी प्रमोद गावडे, प्राचार्य एच. एम. पवार तसेच संस्थेचे पदाधिकारी कृष्णा गमरे, सौ. प्रीती गावडे, सौ. तेजस्विनी शिंगे, सिराज नाकाडे, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या इन्चार्ज सौ. घोसाळकर व सांगता प्राथमिक विभाग इन्चार्ज सौ. शिगवण यांनी केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg