loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री समर्थ कृपा विद्यालयात मुख्याध्यापक सहविचार सभा संपन्न

खेड - श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान संचलित श्री समर्थ कृपा इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्यूनिअर कॉलेज (सी.बी.एस.ई.) वेरळ येथे खेड तालुक्यातील सर्व जि.प. शाळा व खाजगी प्राथमिक, माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापकांची सहविचार सभा पार पडली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्येची आराध्य देवता सरस्वती देवी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. संस्था अध्यक्ष सुयश पाष्टे यांनी शिक्षणाधिकारी रत्नागिरी किरण लोहार आणि गटविकास अधिकारी गणेश मंडलिक, गटशिक्षणाधिकारी खेड विजय बाईत खेड यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सर्व विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षक यांना सत्र-२ मध्ये सर्व शैक्षणिक कामे, विज्ञान प्रदर्शन, क्रीडा स्पर्धा, चाचणी परीक्षा, स्पर्धा परीक्षा, असाक्षर नोंदणी, ऑनलाइन कामे, सहल, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा, निवडणुका, वार्षिक तपासणी विद्यार्थी सुरक्षितता यांविषयी माहिती देऊन मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी संस्थाध्यक्ष सुयश पाष्टे, प्रशालेचे प्राचार्य डॉ.एस.एस. अली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ. मीनाक्षी आंब्रे यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg