loader
Breaking News
Breaking News
Foto

प्रख्यात इतिहास संशोधक 30 रोजी खेडमध्ये

खेड (प्रतिनीधी)- श्री शिवशंभू विचारमंच,रत्नागिरी यांच्यातर्फे खेड येथील रोटरी इंग्लिश मीडियम स्कुल येथे रविवार दि.30नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 यावेळेत एकदिवसीय इतिहास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज व मराठा साम्राज्याचा दैदिप्यमान इतिहास अनेकांच्या जिज्ञासेचा व आवडीचा विषय आहे.या इतिहासाचा योग्य संदर्भयुक्त व वस्तुनिष्ठ अभ्यास कसा करावा याबद्दल या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात येईल, व त्यासाठी महाराष्ट्रातील ज्येष्ठ व नामवंत इतिहास संशोधक,भारत इतिहास संशोधन मंडळाचे सचिव,श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे सरकार्यवाह- श्री.पांडुरंग बलकवडे, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे कार्यवाह,इतिहास तज्ञ- श्री.सुधीर थोरात तसेच श्री शिवशंभू विचारमंचचे संयोजक-श्री.रुपेश मोरे हे वक्ते उपस्थित राहणार आहेत. इतिहास अभ्यास,संशोधन व प्रसार-प्रचार यांस चालना मिळावी,या हेतूने ही कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे. त्यामुळे इतिहासप्रेमींनी याचा अवश्य लाभ घ्यावा,असे आवाहन शिवशंभू विचारमंच रत्नागिरी यांच्यातर्फे करण्यात येत आहे. इतिहास विद्यार्थी, संशोधक, सर्व शिक्षक, इतिहासाची गोडी असणारे कुणीही जिज्ञासूनी या कार्यशाळेमध्ये सहभागी व्हावे. तसेच सहभागी होण्यासाठी खालील नं वरती संपर्क व नोंदणी करावी. डॉ.परेश मळणगांवकर - 8149620202, डॉ.सिद्धेश चिखले - 9921733622, असे आवाहन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg