loader
Breaking News
Breaking News
Foto

निलेश कुंभार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर उत्साहात

संगमेश्वर (सत्यवान विचारे) - संगमेश्वर तालुक्यातील कडवई गावचे सुपुत्र व रत्नागिरी जिल्हा कुंभार समाज जिल्हा संघटक निलेश कुंभार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला उस्फुर्त असा प्रतिसाद मिळत पन्नास रक्तदात्यांनी रक्तदान केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी रत्नागिरी जिल्हा कुंभार समाज जिल्हाध्यक्ष सुभाष गुडेकर, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद इवलेकर, जिल्हा पदाधिकारी श्री.मालवणकर, राम कदम, प्रकाश साळवी दापोली व जिल्हा युवा पदाधिकारी या सर्वांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन संपन्न झाले. या कार्यक्रमात श्री संत गोरा कुंभार युवा प्रतिष्ठानचा उद्घाटन समारंभ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष थेराडे व रत्नागिरी जिल्हा कुंभार समाजाच्या पदाधिकार्‍यांच्या हस्ते झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना निलेश कुंभार युवा प्रतिष्ठान उपाध्यक्ष यांनी प्रतिष्ठानच्या उद्देश व ध्येय यावर प्रकाश टाकत हे प्रतिष्ठान सर्व समाजासाठी कार्यरत असल्याचे स्पष्ट केले. यानंतर युवा प्रतिष्ठानच्यावतीने विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात आला यामध्ये ११८ वेळा रक्तदान करणारे उदय कोळवणकर, ९३ वेळा रक्तदान करणारे मिलिंद चितळे, ३८ वेळा रक्तदान करणारे राजेश पडे, २७ वेळा रक्तदान करणारे संदीप धनावडे, उमेश खैर, सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल अरविंद बांबाडे, जिल्हास्तरीय कबड्डी पंच परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल उदय गावडे, पोस्ट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल आदित्य मयेकर, सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाबद्दल निलेश किंजलकर, राज्यस्तरीय खो-खो खेळाडू कु.आशिष बालदे, धीरज गुरव, आर्यन बालदे, अथर्व गराटे, दहावीत प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल सागर बने, पार्थ बुदर, स्मितराज भुरवणे अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा युवा प्रतिष्ठानच्यावतीने सन्मान करण्यात आला.

टाइम्स स्पेशल

कार्यक्रम प्रसंगी युवा प्रतिष्ठानचे सचिव सुधीर जामसुतकर यांनी प्रतिष्ठानच्या ध्येय धोरणांवर प्रकाश टाकत कुंभार यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. उमेश खैर यांनी आपले मनोगत व्यक्त करत समाजसेवेसाठी असे कार्यक्रम होणे गरजेचे आहे व कुंभार यांनी वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर ठेवले याबद्दल त्यांचे विशेष कौतुक केले. इतर सर्व मान्यवरांनी व उपस्थितांनी श्री.कुंभार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. रक्तदान करणार्‍या सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र, पेन, पोफळीचे झाड व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. रक्तदान शिबिरासाठी डेरवण येथील वालावलकर रुग्णालयाच्या श्री स्वामी समर्थ ब्लड सेंटरच्या डॉ.सुनीता झुंजारवाड, टेक्निकल सुपरवायझर रवी अग्रवाल, सौ.प्रिशा घाडगे, टेक्निशियन पर्णिका सुर्वे, प्रोजेक्ट इन्चार्ज अनिल लोंढे, सहाय्यक वीणा गुरव, आज्ञा कांगणे, नितेश मते यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाला कडवईच्या सरपंच विशाखाताई कुवळेकर, माजी सरपंच वसंत उजगावकर, उपसरपंच दत्ता ओकटे, शेनवडे सरपंच दत्ताशेठ लाखण, तुरळचे माजी सरपंच अरविंद जाधव, मिलिंद कडवईकर, दीपक तुळसणकर ग्रामसेवक आदी मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निलेश तुळसणकर, नीलम कुंभार व सहकारी यांनी मेहनत घेतली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg