रत्नागिरी - भारतीय फिटनेस आणि बॉडी बिल्डिंग महासंघाच्यावतीने रत्नागिरीतील शैलेश जाधव यांची जागतिक प्रो अप शो बेस्ट इंटरनॅशनल बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस चॅम्पियन शिप 2025 आणि आशियाई चॅम्पियनशिप 2025 पटाया येथे भारतीय संघातर्फे आंतरराष्ट्रीय पंच म्हणून निवड करण्यात आलेली आहे तसेच चिपळूण येथील नंदकुमार शिंदे यांची भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. या स्पर्धा 27 नोव्हेंबर 2025 ते 30 नोव्हेंबर 2025 या कालावधीत थायलंड येथे पटाया येथे होणार आहेत.
शैलेश जाधव हे रत्नागिरी जिल्हा हौशी शरीर सौष्ठव संघटनेचे 25 वर्ष संस्थापक कार्यवाह म्हणून कार्यरत होते. सध्या ते संघटनेचे कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत असून ते उत्तम व्यायामपटू तसेच राष्ट्रीय पंच व फिनिक्स फिटनेस व हार्डकोअर जिमचे मालक आहेत. नंदकुमार शिंदे हे आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डर तसेच रत्नागिरी जिल्हा हौशी शरीर सौष्ठव संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. तरी या दोघांचे रत्नागिरी जिल्हा हौशी शरीरसौष्ठव असोसिएशन रत्नागिरी, फिनिक्स जिम, क्रीडा प्रेमी व समाजातील सर्व स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.




















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.