loader
Breaking News
Breaking News
Foto

कोणाळकट्टा येथील तिलारी प्रकल्पाच्या समस्यांबाबत दीपक जाधव आक्रमक

तिलारी (प्रतिनिधी) : तिलारी आंतरराज्य प्रकल्पाच्या कोणाळकट्टा येथील वसाहतीची दुरवस्था, यंत्रणेतील बिघाड आणि अतिक्रमणांच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते दीपक जाधव यांनी आवाज उठवला असून, या समस्या तातडीने सोडवण्याची मागणी प्रशासंकडे केली आहे. जाधव यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकाद्वारे म्हटले आहे की, कोणाळकट्टा येथील वसाहतीमधील निवासस्थाने आणि कार्यालयीन इमारतींची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून, त्यांची तात्काळ देखभाल व दुरुस्ती होणे गरजेचे आहे. तसेच वसाहतीमध्ये विनावापर पडून असलेल्या मोडकळीस आलेल्या इमारती आणि भंगार अवस्थेतील वाहनांचे शासकीय नियमानुसार त्वरित निर्लेखन करावे. धरणावरील आणि इतर ठिकाणची विद्युत व यांत्रिक उपकरणे सध्या बंद किंवा नादुरुस्त अवस्थेत असल्याने प्रकल्पाच्या कामात अडथळे येत आहेत, त्यामुळे ही यंत्रणा दुरुस्त करून पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावी. यासोबतच अतिवृष्टीमुळे तिलारी नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने पुराचा धोका वाढला आहे. हा धोका टाळण्यासाठी नदीपात्रातील गाळ काढून पात्राची खोली वाढवावी आणि संरक्षक उपाययोजना कराव्यात, असे त्यांनी नमूद केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रकल्पाच्या सुरक्षिततेसाठी कामाच्या ठिकाणी आणि धोक्याच्या जागी माहिती दर्शक फलक लावण्याची मागणीही करण्यात आली आहे. याशिवाय, प्रकल्पाच्या जागेवरील अतिक्रमणे हटवून, नदीपात्रातून किंवा कालव्यातून विना परवाना पाणी उपसा करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दीपक जाधव यांनी दिला आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg