loader
Breaking News
Breaking News
Foto

विद्यार्थ्यांनी घेतली कृषि महाविस्तार एआय ॲपची माहिती

मंडणगड (प्रतिनिधी) : येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात गुणवत्ता हमी कक्षा अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभाग व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या वतीने ‘कृषि विभाग ॲपवरील विविध योजना’ तसेच स्पर्धा परीक्षा तयारी या विषयावर मंडणगड तालुका कृषि अधिकारी सोमनाथ आहेरकर यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.वाल्मिक परहर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाधिकारी प्रा. संदीप निर्वाण, डॉ. महेश कुलकर्णी, स्पर्धा परीक्षा विभागप्रमुख डॉ.भरतकुमार सोलापूरे, श्री. जी. के. अभंग, एस. एम. पवार, आर. एस. मर्चंड, बी. एन. नागरगोजे, श्री. जे. एम. पाटील, श्री. माळी, श्री. तळेकर, डॉ. दगडू जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्राचार्य डॉ.वाल्मिक परहर यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचे शब्दसुमनाने स्वागत करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तत्पूर्वी स्पर्धा परीक्षा विभागप्रमुख डॉ. भरतकुमार सोलापुरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मंडणगड कृषि विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी महाराष्ट्र राज्य कृषि विभागाचा ‘महाविस्तार - AI हा ॲप महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या भ्रमणध्वनीमध्ये डाउनलोड करुन देण्यात आला आणि त्यावर संबंधीत विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली. त्यानंतर त्या ॲपवर उपलब्ध असलेल्या शासनाच्या विविध योजनांची व सेवांची सविस्तर माहिती सोमनाथ आहेरकर यांनी दिली. ते म्हणाले की, यामध्ये मृद आरोग्य पत्रिका, खत मात्रा गणक, माहितीपूर्ण व्हिडिओ आणि शेतीशाळा, सर्व पिकांचे बाजारभाव अशा अनेक बाबी या ॲपमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले. त्याबरोबरच विद्यार्थ्यांनी पदवीचे शिक्षण घेत असतानाच स्पर्धा परीक्षांची तयारी करणे का महत्वाचे आहे याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांची थोडक्यात माहिती आणि तयारी कशी करावी याचीही माहिती दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एन.एस.एस कार्यक्रमाधिकारी प्रा. संदीप निर्वाण, डॉ. भरतकुमार सोलापुरे, डॉ.महेश कुलकर्णी, कृषि विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी वर्ग मोठया संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. महेश कुलकर्णी यांनी केले तर शेवटी डॉ. भरतकुमार सोलापुरे यांनी आभार व्यक्त केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg