loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर न.पं. सार्वत्रिक निवडणूक भाजपा-सेना युतीच्या प्रचाराचा व संपर्क कार्यालयाचा शुभारंभ

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक भाजपा सेना युतीच्या प्रचाराचा व संपर्क कार्यालयाचा शुभारंभ माजी आमदार डॉ विनय नातू यांच्याहस्ते करण्यात आले. गुहागर नगरपंचायत निवडणूक २ डिसेंबर रोजी होणार असून शिवसेना भाजपा युतीकडून १७ नगरसेवक व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. युतीमधून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निता विकास मालप व उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ युतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत गुहागरची ग्रामदेवता श्री व्याघ्रांबरी मातेचे दर्शन व आर्शिवाद घेऊन करण्यात आला. यानंतर युतीच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी माजी आमदार डॉ विनय नातू, भाजपाचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, शिवसेनेचे नेते राजेश बेंडल, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस, निवडणूक प्रभारी निलेश सुर्वे, जिल्हा उपाध्यक्ष संतोष जैतापकर, अपूर्वा बारगोडे, नम्रता निमुणकर, सेनेचे तालुकाध्यक्ष दिपक कनगुटकर, किरण खरे, गजानन वेल्हाळ, भाजपा महिला मोर्चा तालुकाध्यक्ष प्रांजल कचरेकर, तालुका सरचिटणीस सचिन ओक, संतोष सांगळे, अमरदिप परचुरे, भाजपा शहराध्यक्ष नरेश पवार, सेना शहराध्यक्ष निलेश मोरे, प्रदिप बेंडल, मंदार पालशेतकर, आशिष विचारे, साईनाथ कळझुणकर, संगम मोरे, ज्योती परचुरे, नगराध्यक्षसहीत सर्व उमेदवार आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg