loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजातील जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अथर्व तेंडुलकर प्रथम तर सानिका यादव द्वितीय

लांजा - लांजा तालुका जयंती महोत्सवाच्यावतीने आयोजित केलेल्या २६ नोव्हेंबर संविधान दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अथर्व संदेश तेंडुलकर यांने प्रथम तर सानिका उदय यादव हिने द्वितीय क्रमांक पटकावला, तर तृतीय क्रमांक सोनाली कदम हिने पटकावला. २६ नोव्हेंबर संविधान दिनाच्यानिमित्ताने व सामाजिक कार्यकर्ते दिवंगत राजेंद्र आयरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धा या शहरातील कुलकर्णी-काळे छात्रालय येथे पार पडल्या. या स्पर्धेच्या उद्धाटनाप्रसंगी जिल्ह्यातील समाजिक कार्यकर्ते आनंदा कांबळे (माजळकर), सामाजिक कार्यकर्ते सुधाकर कांबळे, लांजा तालुका जयंती महोत्सव कमिटीचे अध्यक्ष डॉ. रोहिनील जाधव, विश्वजित कांबळे, उज्वल पवार, प्रदीप पवार, किशोर कांबळे, प्राजक्ता जावडेकर, मधुरा कांबळे, अनिल कासारे उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्पर्धेची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. स्पर्धेचे परिक्षण इम्तियाज सिद्दीकी यांनी केले. स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील एकूण १३ स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. यामध्ये उत्तेजनार्थ क्रमांक सेजल श्याम तांबे, विदुला रामकृष्ण कुलकर्णी, मुजीबा समीर लांबे यांनी पटकावला. विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व रोख रक्कम रु.५ हजार, रु.३ हजार, रु.२ हजार देऊन मान्यवरांच्याहस्ते गौरविण्यात आले. यावेळी आनंदा कांबळे, सुधाकर कांबळे व परिक्षक इम्तियाज सिद्दीकी यांनी उपस्थित स्पर्धक विध्यार्थी व पालकवर्गाला मार्गदर्शन केले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी लांजा तालुका जयंती महोत्सवाच्या सर्व पदाधिकार्‍यांनी मेहनत घेतली.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg