loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी तालुका तेली समाज सेवा संघाच्या वतीने कुवारबाव येथे संपर्क अभियानांतर्गत सभा

वरवेली (गणेश किर्वे) - रत्नागिरी तालुका तेली समाज सेवा संघाच्या वतीने संपर्क अभियानांतर्गत संवाद साधण्यात येत आहे. त्या निमित्ताने ग्रामपंचायत सभागृह कुवारबाव ता.जि.रत्नागिरी येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला कुवारबाव, साईनगर, टिआरपी, हनुमाननगर, गयाळवाडी, कारवांचीवांडी, रविंद्र नगर, आदर्श वसाहत व आजूबाजूच्या परिसरातील तेली समाज बंधुभगिनी बहुसंख्येने उपस्थित होते. बैठकीच्या सुरवातीला रत्नागिरी तालुका कार्याध्यक्ष व माजी सरपंच सचिन(बबलू)कोतवडेकर यांनी सर्व मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करुन आजच्या बैठकीचा उद्देश विषद करत प्रास्ताविक केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मुख्य कार्यक्रमाला सुरवात करताना रत्नागिरी तालुकाध्यक्ष सचिन लांजेकर, सामाजिक कार्यकर्ते नारायण झगडे, जिल्हाकार्याध्यक्ष दिपक राऊत, जिल्हाध्यक्ष रघुविर शेलार यांनी तालुक्यात राबविण्यात येत असलेले विविध उपक्रम, संघटना मजबूत होऊन सर्वांनी एकत्र येऊन काम करणे कसे गरजेचे आहे, ओबीसी म्हणजे काय आणि त्यांचे हक्क व अधिकार काय, तेली समाज सेवा संघ या संघटनेची सध्याची वाटचाल, रत्नागिरी शहराजवळ सर्व तेली समाजासाठी, समाजाच्या माध्यमातून स्वाभिमानाचे प्रतिक म्हणून उभारण्यात येत असलेले तेली समाज भवन इत्यादी सर्व महत्वाच्या विषयांवर या सर्वांनी अतिशय चांगले मार्गदर्शन केले. या बैठकीला जिल्हा सचिव संदिप पवार, रत्नागिरी तालुका सचिव रुपेश शेलार, तालुका उपाध्यक्ष मंगेश शेट्ये हे आवर्जून उपस्थित होते. यापुढे सर्वांनी एकत्र काम करीत एकमेकांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

टाइम्स स्पेशल

ही बैठक यशस्वी करण्यासाठी स्मिता पावसकर, ऐश्वर्या कदम, बबलू कोतवडेकर, उमेश राऊत, मंगेश शेट्ये, राजेंद्र झगडे, संजय चव्हाण, सुनिल तळगावकर, श्रीकृष्ण रसाळ, सुरेंद्र टिळेकर, प्रदिप नेवरेकर, तरुण शेट्ये, सदानंद पावसकर, संतोष पावसकर, किरण आंब्रे, अजित वरसकर, साईप्रसाद पावसकर, सुनिल खानविलकर, प्रथमेश तळगावकर, सुरेश शेलार, सदानंद शेलार इत्यादी सर्वच तेली समाज बंधुभगिनींनी अतिशय मेहनत घेतली. शेवटी उमेश राऊत यांनी सर्वांचे आभार व्यक्त करून बैठक समाप्त झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg