loader
Breaking News
Breaking News
Foto

दि न्यू इंडिया एश्योरन्स कं.लि खेड शाखेत मोफत नेत्र तपासणी शिबीर

खेड (प्रतिनिधी) - खेड.दि न्यू इंडिया एश्योरन्स कं.लि खेड व इन्फिगो आय केयर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने खेड शाखेत मोफत नेत्र तपासणी शिबीर चे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिरमध्ये ग्राहक वर्ग व इतर सर्व सामान्य लोक त्याचप्रमाणे लायन्स क्लब व जे.सी.आय खेड च्या सदस्यानी सहभाग घेतला. या अंतर्गात एकूण ५६ रुग्णांची तपासणी करण्यात आली व त्यातील काही रुग्णांना डोळ्यांचे गंभीर आजार निदर्शनास येऊन त्यांना पुढील उपचारासाठी इन्फीगो आय केयर हॉस्पिटल सूचित करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदर प्रसंगी दि न्यू इंडिया एश्योरन्स कं.लि खेड चे शाखा अधिकारी श्रेयस मोरे तसेच हनिफ घनसार व शाखेतील सर्व कर्मचारी व प्रतिनीधी वर्ग उपस्थित होते. या शिबिरमध्ये माझी सभापती सिकंदरभाई जस्नाईक, मुकादम डेव्हलोपर्स चे मालक शम्सभाई मुकादम, लायन्स क्ल्ब चे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर व रोहन विचारे, माणिक, लोहार तसेच बशीर भाई हमदुले, आर.डी.सी. बँक राज माने साहेब उपस्थित होते. या शिबिरात इन्फीगो आय केयर हॉस्पिटल तर्फे अनंत सावंत व कर्मचारी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg