वेळणेश्वर (उमेश शिंदे) - गुहागर नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या भाजप सेना युतीच्या प्रचार सभेसाठी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योग मंत्री नामदार उदय सामंत गुहागर दौऱ्यावर येत असून त्यांच्या उपस्थितीत युतीचा मेळावा संपन्न होणार आहे. नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर होऊन प्रचाराला सुरुवात झाली असून भाजप शिवसेना युतीची घोषणा झाल्यानंतर युतीच्या प्रचाराचा शुभारंभही करण्यात आला.
दिनांक 25 नोव्हेंबर रोजी दुपारी ठीक तीन वाजता नामदार उदय सामंत यांचा युतीचा मेळावा आणि प्रचार सभा संपन्न होणार आहे. गुहागर तालुक्यातील कीर्तनवाडी सभागृहामध्ये ही सभा संपन्न होणार असून पालकमंत्री उदय सामंत यांच्या समवेत माजी आमदार डॉक्टर विनय नातू तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष सतीश मोरे व युतीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती गुहागर शिवसेना शहर प्रमुख निलेश मोरे यांनी पत्रकारांना दिली.






































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.