loader
Breaking News
Breaking News
Foto

जल फाऊंडेशनला राज्यस्तर आदर्श संघटना पुरस्कार प्रदान

खेड (प्रतिनिधी) - सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, सहकार, वैद्यकीय क्षेत्रात भरीव कामगिरी करत ग्रामीण भागातील पाणीटंचाईची समस्या निकाली काढून ग्रामस्थांना दिलासा देण्यासाठी अविरतपणे झटणार्‍या जल फाऊंडेशन कोकण विभाग संस्थेच्या राज्यस्तरीय आदर्श संघटना पुरस्कार प्राप्त झाला आहे. ’दिशा महाराष्ट्राची च्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्याला वाहून घेतलेल्या जल फाऊंडेशन सदस्यांच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात दमदार कामगिरी करताना गरजूंना पूरक प्रमाणात शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देत त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अग्रस्थानी राहिले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विशेषतः कोकणवासियांच्या रेल्वेप्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करत रेल्वे बोर्डाकडून सोयी-सुविधांसह जादा रेल्वेगाड्या सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. यासाठी आंदोलने, उपोषणाचा अवलंब करत रेल्वे प्रशासनाला जागे केले. तालुक्यातील डोंगराळ भागातील ग्रामस्थांना वर्षानुवर्षे सतावणारी पाणीटंचाईची समस्या निकाली काढून त्यांची पायपीट थांबवण्यासाठी जल फाऊंडेशनने विंधन विहिरी खोदून देण्याची कामगिरी केली आहे. अनेक ठिकाणी साठवण टाक्यांचीही उपलब्धता करून दिली आहे. यामुळे अनेक गावातील वाड्या ’पाणीदार’ झाल्या असून ग्रामस्थांच्या भटकंतीला पूर्णविराम दिला आहे.

टाईम्स स्पेशल

संकटात सापडलेल्यांना मदतीचा हात देण्यासाठी संस्था नेहमीच अग्रस्थानी राहिली आहे. जल फाऊंडेशनच्या या कार्याची दखल घेत देण्यात आलेला राज्यस्तरीय आदर्श संघटना पुरस्कार संस्थापक अध्यक्ष नितीन जाधव, उपाध्यक्ष सचिन काते, उपसचिव सुदर्शन जाधव, किशोर ठसाळ यांनी स्वीकारला. याप्रसंगी दीपक मोरे, चेतन शिंगरे, महेंद्र शिगवण, भास्कर आग्रे आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg