loader
Breaking News
Breaking News
Foto

आनंद जाधव राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्काराने सन्मानित

आबलोली (संदेश कदम) - सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय आणि भरीव कामगिरी करुन गेली अनेक वर्ष ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थांचा शैक्षणिक आणि सामाजिक विकास व्हावा यासाठी सामाजिक कार्याचा ध्यास घेतलेले आणि वडील दिवंगत शिवराम पांडुरंग जाधव, आई दिवंगत प्रभावती शिवराम जाधव यांनी दिलेल्या समाजसेवेचा वसा घेऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक कार्यात स्वत:ला झोकून देऊन निस्वार्थपणे तन मन धन अर्पण करणारे गुहागर तालुक्यातील कुडली गावचे सुपुत्र आणि शिव प्रभा या सामाजिक संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष आनंद शिवराम जाधव यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार २०२५ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार २०२५ हा पुरस्कार वेब पोर्टल आणि युटूब चॅनलच्या, दिशा महाराष्ट्राची या संस्थेच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दुसरे कवी संमेलन आणि राज्यस्तरीय सन्मान सोहळ्यात आनंद शिवराम जाधव यांना तुषार गौतम नेवरेकर, कर्नाटक येथील सामाजिक कार्यकर्त्या डॉ.रोहिणी दिक्षित यांच्या प्रमुख उपस्थितीत संपादक, साहित्यिक आणि कवी सरकार इंगळी यांच्या हस्ते देण्यात आला.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg