loader
Breaking News
Breaking News
Foto

ठाणे जिल्हा शूटिंगबॉल ​असोसिएशन तर्फे जिल्हा निवड चाचणी स्पर्धा यशस्वी

ठाणे (प्रतिनिधी)- ठाणे जिल्हा शूटिंगबॉल असोसिएशनतर्फे सब-ज्युनियर, ज्युनियर आणि सिनियर मुलगे व मुली गटांसाठीची जिल्हा निवड चाचणी २३ नोव्हेंबर २०२५ रोजी केबीपी कॉलेज, वागळे इस्टेट येथे यशस्वीरीत्या संपन्न झाली. जिल्हा निवड चाचणीचे उद्घाटन ठाणे जिल्हा शूटिंगबॉल संघटनेचे अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे, आगरी सेना प्रमुख राजाराम साळवी, माजी महापौर मनोहर साळवी व छत्रपती पुरस्कार विजेते अशोक चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. जिल्ह्यातील १०० पेक्षा अधिक खेळाडूंनी आपला उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जिल्हा चाचणी २०२५ - प्रथम क्रमांक विजेते - १७ वर्षांखालील मुली : सरस्वती विद्यालय, राबोडी; १७ वर्षांखालील मुले : पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्कूल, कोपरी; १९ वर्षांखालील मुले : सरस्वती विद्यालय, राबोडी; १९ वर्षांखालील मुली : मनीषा विद्यालय, कळवा; सीनियर पुरुष : कल्याण स्पोर्ट्स बॉईज टीम. उत्कृष्ट खेळाडू - सीनियर मुलगे : ओंकार शिंदे - ओम साई, डोंबिवली; १७ वर्षांखालील मुले : सुजय पालीवाल, सरस्वती विद्यालय, राबोडी; १७ वर्षांखालील मुली : आर्या पाटील, मनस्वी नखाते - सरस्वती विद्यालय, राबोडी; १९ वर्षांखालील मुली : अश्विनी गाडेकर - मनीषा विद्यालय, कळवा; १९ वर्षांखालील मुले: अथर्व यादव - सरस्वती स्कूल, राबोडी. ठाणे शूटिंगबॉल संघटना जिल्ह्यातील खेळाडूंना अधिक संधी देण्यासाठी आणि खेळाचा प्रसार वाढवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg