loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडमध्ये मध्यरात्री मद्यधुंद व्यक्तींची धिंगामस्ती – नागरिक भयभीत, पोलिसांवर वाढला ताण

खेड – खेड रेल्वे स्टेशन परिसरात मद्यपींचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत चालला असून, स्थानिक नागरिक, प्रवासी तसेच पोलिस प्रशासन अक्षरशः हैराण झाले आहे. परगाव व परराज्यातून येणाऱ्या काही बेवारस व्यक्तींचा या भागात कायमस्वरूपी मुक्काम होत असून, मद्यधुंद अवस्थेत होणारे प्रकार आता चिंताजनक पातळीवर पोहोचले आहेत. स्टेशन परिसरात कुठेही जागा मिळेल तिथे हे मद्यपी झोपू लागले आहेत. कधी रेल्वे स्थानकातील बाकांवर, तर कधी प्लॅटफॉर्मवरील जिन्याखाली; इतकेच नाही तर रेल्वे स्थानकासमोरील दुकानांच्या समोर पार्क केलेल्या वाहनातही काही मद्यपी झोपल्याचे प्रकार समोर आले आहेत. या धक्कादायक वर्तनामुळे व्यापारी, प्रवासी आणि आसपासच्या सोसायट्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या उपद्रवी मद्यप्यांनी आता गृहनिर्माण सोसायट्यांच्या परिसरातही घुसखोरी करणे सुरू केले आहे. पार्किंगमध्ये पडून राहणे, मध्यरात्री आरडाओरडा करणे, तसेच बेशुद्ध अवस्थेत भावनसखोल झोपणे – यामुळे महिलांमध्ये आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना तीव्र झाली आहे. नागरिकांनी अनेक वेळा याबाबत पोलिस व स्टेशन प्रशासनाकडे तक्रारी नोंदवल्या आहेत. रेल्वे स्थानकातही हे मद्यपी अनधिकृतरीत्या प्रवेश करून प्रवाशांच्या ये-जा मार्गात अडथळे निर्माण करतात. होमगार्ड व रेल्वे पोलिसांना त्यांना बाहेर काढण्यासाठी रात्रभर धावपळ करावी लागत असून, पोलिस दलावरही या वाढत्या त्रासाचा ताण जाणवू लागला आहे. स्थिती इतकी बिकट झाली आहे की मागील काही दिवसांत पाच ते सहा मद्यपी बेशुद्धावस्थेत आढळून आले आणि त्यांना रुग्णवाहिकेतून दवाखान्यात हलवावे लागले. अतिदारू सेवनामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

टाईम्स स्पेशल

वेरळ– साईनगर परिसरातही याच स्वरूपाचा त्रास वाढत असल्याने नागरिकांनी प्रशासनाकडे कडक कारवाईची मागणी जोर धरली आहे. स्टेशन परिसरात गस्त, मद्यपींना पुनर्वसन केंद्रात हलवणे, तसेच सार्वजनिक सुरक्षेसाठी वाढीव पोलिस बंदोबस्ताची मागणी होत असून, समस्या नियंत्रणात न आल्यास ती मोठ्या स्वरूप धारण करू शकते, अशी नागरिकांची भीती व्यक्त केली जात आहे. खेड रेल्वे स्टेशन परिसरातील ही गंभीर परिस्थिती तातडीने आवरावी, अशी मागणी स्थानिकांनी प्रशासनाकडे पुन्हा एकदा केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg