loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजात आमदार किरण सामंत यांच्या हस्ते महायुतीच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन

केळंबे-लांजा (प्रतिनिधी) - लांजा नगरपंचायत निवडणुकीसाठी महायुतीच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन आमदार किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत लांजा गावचे प्रमुख मानकरी सुधाकर उर्फ नाना शेट्ये यांचे हस्ते फित कापून पार पडले. लांजा शहरातील कीर्ती महल हॉटेल शेजारी निवडणूक कार्यालय सुरू करण्यात आले आहे. उद्घाटन प्रसंगी लांजा गावचे प्रमुख मानकरी सुधाकर शेट्ये, कमलाकर गांधी, राजू कुरूप, सुभाष कुंभार, मयूर शेडे तसेच इतर सर्व मानकरी उपस्थित होते. उद्घाटनानंतर आमदार किरण सामंत यांनी सर्व उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमाला आमदार किरण सामंत, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनिल कुरुप, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेश खामकर, लांजा तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रसन्न शेट्ये, नाना शेट्ये, उद्योजक विकास शेट्ये भाजपा तालुकाध्यक्ष शैलेश खामकर, आश्रफ रखांगी, हेमंत शेट्ये, युवराज कुरूप, लल्या कुरुप, प्रसाद भाईशेट्ये, गुरुप्रसाद तेली तसेच सर्व उमेदवार आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg