सावंतवाडी: स्थानिक निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना, सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला (भाजप) सर्वप्रथम प्रचारसभा घ्यावी लागल्यामुळेच त्यांना पराभवाची भीती वाटू लागली आहे, असा थेट टोला उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांनी लगावला आहे. भाजपच्या प्रचारसभेत प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि पालकमंत्री नितेश राणे उपस्थित होते. या सभेवर टीका करताना राऊळ म्हणाले, "राज्यात मुख्यमंत्री असताना त्यांना सावंतवाडीत यावं लागलं. जनतेशी जर नाळ असती, तर ही वेळ आली नसती." पालकमंत्री नितेश राणे यांनी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरून राऊळ यांनी जोरदार निशाणा साधला आहे. "पालकमंत्री नितेश राणेंच्या केसरकरांवरील वक्तव्यावरून आतला गेम दिसत आहे. मात्र, यात गेम कुणाचा होतो? हे बघावं लागेल," असा सूचक टोला त्यांनी हाणला.
रविंद्र चव्हाण सांगतील तेव्हा केसरकर व्यासपीठावर उपस्थित राहतील, असे राणे म्हणत आहेत. यामुळे 'यात गेम कुणाचा होणार?' हा मुख्य मुद्दा असल्याचे राऊळ यांनी नमूद केले. जनतेचा विकास करण्यात कमी पडल्यामुळेच भाजपवर सर्वप्रथम प्रचारसभा घेण्याची वेळ आली, असे राऊळ यांचे मत आहे. "आमच्या उमेदवार सीमा मठकर नगराध्यक्षपदासाठी निवडणूक रिंगणात आहेत. त्यांना जनतेचा चांगला प्रतिसाद मिळतोय. हाकेला साथ देणाऱ्या आमच्या उमेदवार असल्याने त्यांचा विजय निश्चित आहे. याची दखल भाजपला घ्यावी लागली," असे राऊळ म्हणाले. केसरकरांचे राजकीय वजन घटले?: दीपक केसरकर यांच्यावर विकास न केल्यामुळे पक्षातून हद्दपार केल्यासारखी परिस्थिती आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिल्हाप्रमुख संजू परब यांना फोन करत असल्याने केसरकरांचे राजकीय वजन कमी होत चालल्याचे दिसत आहे. केसरकर समर्थकांची तिकीट कापली गेली, असा टोलाही त्यांनी लगावला.
"विकासाच्या मुद्यावर हे केवळ दिशाभूल करत आहेत. संजू परब देखील भाजपचे नगराध्यक्ष म्हणून बसले होते. त्यामुळे इथली जनता नक्की इतिहास घडवेल. धनशक्ती विरोधात जनशक्तीचा विजय दिसून येईल," असा विश्वास रूपेश राऊळ यांनी व्यक्त केला. राऊळ यांनी राजघराण्याचा आदर व्यक्त करतानाच निवडणुकीकडे निवडणुकीप्रमाणे पाहण्याची भूमिका स्पष्ट केली. "पालकमंत्र्यांनी राजघराण्याला खासदार, आमदार म्हणून घेत मंत्रीपद द्यावं व शहराचा विकास करून घ्यावा," असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. यावेळी उबाठा शिवसेनेचे संघटक निशांत तोरसकर उपस्थित होते.






































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.