loader
Breaking News
Breaking News
Foto

निवखोल- राजिवडा-थिबा पॅलेसच्या विकासासाठी संधी द्या : फरजाना दाव्त

रत्नागिरी (वार्ताहर) : आगामी निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक ८ (निवखोल, राजिवडा, थिबा पॅलेस) मधून भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या उमेदवार सौ. फरजाना शकील दाव्त यांनी नागरिकांना भावनिक आवाहन करत, आपल्या समस्या सोडवण्यासाठी आणि विकासाच्या प्रवाहात सहभागी होण्यासाठी कॉंग्रेसच्या ‘हात’ निशाणीला मतदान करण्याची विनंती केली आहे. त्यांनी नागरिकांना ‘मतदान व्यक्तीला नाही, तर वॉर्डाच्या उज्ज्वल भविष्यासाठी’ असेल, असा विश्वास दिला आहे. सौ. दाव्त यांनी आपल्या बोलण्यात स्पष्ट केले की, प्रभाग क्रमांक ८ मधील निवखोल, राजिवडा आणि थिबा पॅलेस हे तिन्ही भाग वर्षानुवर्षे विकासापासून वंचित राहिले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अनेक नगरसेवक आले-गेले, पण या भागांकडे कोणीही पुरेसे लक्ष दिले नाही. विशेषतः राजिवडा गावातील रस्त्यांची दुरवस्था ही येथील नागरिकांची रोजची वेदना बनली आहे. पावसाळ्यात रस्त्यावरून जाणे म्हणजे मोठा त्रास आणि अडचण ठरते. दरवर्षी तात्पुरत्या उपाययोजना होतात, पण रस्त्याची डागडुजी आणि कायमस्वरूपी काम कोणीही ठोसपणे केले नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. विकास हा आपल्या हक्काचा आहे, असे स्पष्ट आश्वासन देत सौ. दाव्त यांनी नागरिकांना संधी देण्याची विनंती केली आहे. नगरसेवक म्हणून निवडून आल्यास, निवखोल-राजिवडा-थिबा पॅलेस या तिन्ही भागांमध्ये प्रलंबित असलेली सर्व महत्त्वाची कामे हक्काने, नियोजनबद्ध आणि प्राधान्याने पूर्ण केली जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. प्रभाग ८ च्या विकासासाठी सौ. फरजाना दाव्त यांनी एक चतुःसूत्री योजना सादर केली आहे ज्यामध्ये आधुनिक मच्छी मार्केट: महिलांसाठी स्वच्छ, सुरक्षित आणि आधुनिक सुविधांसह पिण्याचे पाणी, लाइट्स आणि शेडची सुयोग्य सोय उपलब्ध करून रोजच्या अडचणी दूर केल्या जातील, असे त्या म्हणाल्या

टाइम्स स्पेशल

शासनाच्या योजनांची थेट माहिती महिलांपर्यंत पोहोचवून, आर्थिक सक्षमीकरणासाठी विशेष प्रशिक्षण दिले जाईल. मच्छीमार बांधवांच्या दैनंदिन अडचणींचे वेगाने निवारण, सुरक्षितता आणि आवश्यक सोयींची वाढ तसेच त्यांच्या हक्कांसाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल. राजिवडा, निवखोल आणि थिबा पॅलेस येथील रस्त्यांचे दर्जेदार आणि कायमस्वरूपी काम, सर्वांसाठी स्वच्छ पाण्याची उपलब्धता, ड्रेनेज व गटारांची योग्य व्यवस्था, तसेच प्रकाशयोजना आणि सुरक्षिततेचा दर्जा उंचावणे, यावर लक्ष केंद्रित केले जाईल, असे त्यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg