बांदा (प्रतिनिधी) - घारपी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत संविधान सन्मान दिवस विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल जाण, लोकशाही मूल्यांबद्दल आदर आणि राष्ट्रीय कर्तव्यांची जाणीव निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू होता. कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत संवेदनशील अशा २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून झाली. यानंतर संपूर्ण संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन घडवून आणण्यात आले. विद्यार्थ्यांनी “ आम्ही भारताचे लोक...” या शब्दांपासून सुरू होणारी उद्देशिका एकच स्वरात वाचली. उद्देशिकेतील मूल्यांचा अर्थ, लोकशाहीचे स्वरूप व नागरिकांचे कर्तव्य यांबद्दल शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या दिवशी विद्यार्थ्यांनी गावातून काढलेली संविधान प्रभातफेरी लक्षवेधी ठरली. विद्यार्थ्यांनी संविधानातील मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्ये, लोकशाही तत्वे यांवरील संदेशफलक हातात घेत गावातील प्रमुख मार्गांनी फेरी काढली. “ आमचे संविधान आमचा आमचा अभिमान”, “एक देश – एक संविधान” अशा विविध घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. प्रभातफेरीनंतर विद्यार्थी व ग्रामस्थ यांनी एकत्रित येत संविधान एकता साखळी तयार केली. विद्यार्थ्यांनी हातात हात घालून राष्ट्रीय एकता, बंधुभाव आणि सामाजिक समरसतेचा संदेश दिला. विविधतेत एकता हा भारतीय संविधानाचा मुख्य आधार आहे, हे प्रत्यक्ष कृतीतून विद्यार्थ्यांनी दाखवून दिले.
या दिवशी विद्यार्थ्यांची संविधान लेखन स्पर्धा घेण्यात आली. व देशभक्तीपर गीतगायन स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक जे.डी.पाटील यांनी संविधान दिवसाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना “लोकशाहीचे रक्षण हे प्रत्येक नागरिकाचे सततचे कर्तव्य आहे” असा प्रेरणादायी संदेश दिला. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सहकारी शिक्षक मुरलीधर उमरे, धर्मराज खंडागळे, आशिष तांदुळे अंगणवाडी सेविका संजना गावकर मदतनीस अमृता कविटकर, मदतनीस संचिता सावंत यांनी परिश्रम घेतले.






































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.