loader
Breaking News
Breaking News
Foto

पाडलोस-केणीवाड्यातील स्ट्रीट लाईट पाच महिन्यांनंतर सुरू

बांदा (प्रतिनिधी) - पाडलोस केणीवाड्यातील स्ट्रीट लाईट गेल्या पाच महिन्यांपासून बंद असल्याने परिसर पूर्णत: अंधारात बुडाला होता. रात्रीच्या वेळी रस्त्यावरून वाहतूक आणि पादचारी हालचाल धोकादायक बनली होती. परंतु सामाजिक कार्यकर्ते गौरेश पटेकर यांचा पाठपुरावा आणि पाडलोस ग्रामपंचायतचे सहकार्यामुळे स्ट्रीट लाईट सुरू झाल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळी यांसारखे प्रमुख सण देखील या अंधारातच पार पडले. परंतु समस्या सुटत नव्हती. सदर समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते गौरेश पटेकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला. ग्रामपंचायत व वीज वितरणच्या सहकार्याने अखेर स्ट्रीट लाईट दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आले. लाईटवरील विद्युत वाहिन्यांभोवती वाढलेली झुडपे देखील ग्रामस्थांनी श्रमदानातून हटवून मदत केली.

टाईम्स स्पेशल

दुरुस्तीचे काम पूर्ण होताच स्ट्रीट लाईट पुन्हा सुरू झाली आणि केणीवाडा परिसर प्रकाशमान झाला. दीर्घ प्रतीक्षेनंतर समस्या मार्गी लागल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करण्यात येत आहे. ग्रामपंचायत कर्मचारी आकाश गावडे यावेळी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg