देवरूख (सुरेश सप्रे) - देवरूख शहरातील प्रभाग सहा मधून उबाठा शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस शप- काँग्रेस. वंचित महा आघाडीकडून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवार सौ शर्मिला अनिल भुवड यांनी सहा प्रभागाच्या सर्वागीण आणि शाश्वत विकास साधण्याच्या उद्देशाने मुलभूत सुविधा, क्रीडा-सांस्कृतिक प्रोत्साहन, शिक्षण, आरोग्य, महिला सबलीकरण आणि पर्यावरणीय सुधारणा यांना केंद्रस्थानी ठेवून संकल्प मांडले आहेत. गेल्या अनेक वर्षापासून सहा प्रभागात पती अनिल यांनी ग्रामपंचायत सदस्य म्हणून तसेच काँग्रेसचे माध्यमातून विविध विकासा कामात सातत्याने पाठपुरावा करून कामे केली आहेत. या प्रभागात मला संधी दीली तर मी ही त्याचे प्रमाणे काम करून चांगल्या नागरी सुविधा देण्यासाठी कटीबध्द असल्याचा दावा शर्मिला भुवड यांनी केला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते म्हणून अनिल भुवड यांचे बरोबर मी शहरात सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व आपत्कालीन मदतकार्याच्या माध्यमातून काम केले आहे. या कामांमुळेच या प्रभागात महीला राखीव आरक्षण पडल्याने त्यांना संधी मिळाली दिली आहे. कोणतीही अपेक्षा न ठेवता केलेल्या सातत्यपूर्ण सेवेमुळे या विभागात समस्त भुवड परिवाराबद्दल दृढ विश्वास आहे. राजकीय पक्षाचा झेंडा बाजूला ठेवून जनसामान्यांसह विभागातील युवकांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व घटकांशी आपुलकीने आणि तत्परतेने काम करण्याची या परिवाराची कार्यशैली हा शर्मिला भुवड त्यांचा मुख्य आधार मानला जात आहे.
महिलांसाठी विविध उपक्रम, विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन, परिसरातील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून नागरिक केंद्रित कार्य करून जनसामान्यांना सोयीसुविधा देण्यासाठी प्रयत्न करीन असा विश्वास त्यांनी व्यक्त करून अविरतपणे काम करण्याची संधी या प्रभागातील मतदारांनी द्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे. सामाजिक कर्तव्यभावनेतून स्थानिकांच्या दैनंदिन अडचणी आणि मूलभूत प्रश्नांसाठी सतत पाठपुरावा आणि प्रशासनाशी समन्वय साधत प्रभागातील महिला वर्ग , युवक व ज्येष्ठ नागरिकांमध्ये त्यांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.























































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.