loader
Breaking News
Breaking News
Foto

साटेली गावात पुरातन शिवलिंग नंदी मूर्तीची भक्तिमय वातावरणात पुन:प्रतिष्ठापना

दोडामार्ग (प्रतिनिधी) - गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षा असलेल्या साटेली गावातील पांडवकालीन पुरातन शिवलिंग नंदी मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा गुरुवारी भक्तिमय वातावरणात पार पडला. ठरलेल्या शुभ मुहूर्तावर शिवलिंग नंदी मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली. हा शानदार धार्मिक सोहळा पाहण्यासाठी तसेच शिवलिंग नंदी दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक दाखल झाले होते. ब्राह्मण मंडळी यांच्या मंञ घोषाने ठरलेल्या मुहूर्तावर, कलशशिकर, तसेच लिंगेश्वर देवता, नंदी मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली. या धार्मिक क्षणाचा लाभ घेण्यासाठी भाविक दाखल झाले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

साटेली गावात पुरातन शिवलिंग नंदी मूर्ती होत्या. पांडवकालीन पुरातन काळातील नंदी मूर्ती होत्या तो छोटेखानी मंदिर होते या मंदिराचा जीर्णोद्धार तसेच पुन:मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा करण्याचा संकल्प साटेली ग्रामस्थ यांनी केला आणि तो अमलात आणला. आणि शेवटी हा धार्मिक सोहळा पार पडला हजारो भाविक गावात दाखल झाले. सकाळी सात वाजता धार्मिक विधी सुरू झाल्या देवतांचे अवसार उभे राहिले. शिवलिंग नंदी मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा निमित्ताने साटेली गावातील सर्व ग्रामस्थ महिला तसेच नातेवाईक, गावातील लग्न करून बाहेर गावी दिलेल्या विवाहित स्त्रिया, त्यांचे नातेवाईक, तसेच गावाशी सीमधडे म्हणून जोडल्या गेलेल्या गावातील मानकरी दाखल झाले होते. गावातील महिलांनी यावेळी दर्शन घेऊन ग्रामदेवता श्री देवी सातेरी येथे ओटी भरली. प्राकार शुध्दी, शांतीपीठ, देवता पूजन, तत्वहोम, नंतर शिवलिंग नंदी मंदिराच्या शिखर कलश प्रतिष्ठा करण्यात आली. या नंतर ढोलताशांच्या गजरात अवसारी पुरूष मंडळी यांच्या वतीने शिवलिंग, नंदी मूर्ती मंदिराच्या सभोवताली प्रदक्षिणा घालत मंदिराच्या ठिकाणी आणल्या या नंतर विधिवत मंञ घोषाने ठरलेल्या वेळेत मंगलाष्टके, म्हणून मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली. या नंतर इतर धार्मिक विधी पार पडले. हर हर महादेव, पार्वती पते हरहर महादेव, श्री देवी सातेरी देवीचा जयजयकार, असा जयघोष करण्यात आला शिवलिंग नंदी मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा निमित्ताने फटाक्यांची आतषबाजी देखील करण्यात आली.

टाइम्स स्पेशल

महापूजा बलिदान पुर्णाहुती अभिषेक, नंतर जमलेल्या भाविकांच्या उपस्थित आरती पार पडली. गाऱ्हाणे, घालण्यात आले. या नंतर आलेल्या भाविकांना रांगेत शिवलिंग नंदी मूर्ती दर्शन घेण्यासाठी सोडण्यात आले. दर्शन घेण्यासाठी पुरूष, महिला, अशा दोन रांगा लावण्यात आल्या होत्या. गावातील मानकरी यांनी सीमधडे म्हणून बोलावलेल्या विविध गावातील मानकरी यांना वाजत गाजत मंदिराच्या ठिकाणी आणून त्यांचा सन्मान करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg