loader
Breaking News
Breaking News
Foto

जि.प.पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी मेर्वी शाळेत संविधान दिन आणि शाळेचा वर्धापनदिन उत्साहात

गावखडी (वार्ताहर) - रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा मेर्वी शाळेत भारतीय संविधान दिन आणि जिल्हा परिषद मेर्वी शाळेचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रारंभीस भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला भारतीय संविधानाचे प्रास्ताविकेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर सरस्वती च्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमात भारतीय संविधानाचे महत्त्व भारतीय संविधानाविषयी माहिती आणि शाळेच्या वर्धापन दिनानिमित्त मेर्वी शाळेचे मुख्याध्यापक श्री हिदायत भाटकर, उपशिक्षक श्री चंद्रशेखर पेटकर, माजी पोलीस पाटील सुरेश खरडे, माजी सरपंच शशिकांत म्हादये, शशिकांत खरडे आदी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून मेर्वी शाळा स्थापनेपासून च्या इतिहासाबाबत सर्व माहिती कथन केली तसेच मेर्वी शाळा कला ,क्रीडा, शैक्षणिक क्षेत्रात उत्तमरीत्या प्रगतीपथावर आहे याबाबत समाधान व्यक्त केले आणि शाळेच्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा दिल्या. भारतीय संविधान दिनानिमित्त आणि शाळेच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा मेर्वी शाळेत भारतीय संविधान दिनाचे महत्त्व आणि माझी शाळा सुंदर शाळा या विषयावर निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आधी स्पर्धांचे विद्यार्थ्यांसाठी आयोजन करण्यात आले होते तसेच मेर्वी शाळेची प्रतिकृती विद्यार्थ्यांनी अतिशय सुबकरीत्या साकारण्यात साकारली आहे. मेर्वी शाळेची सुबक प्रतिकृती सर्वांचे आकर्षण ठरले आहे.

टाइम्स स्पेशल

कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मेर्वी शाळेचे मुख्याध्यापक हिदायत भाटकर , विषय शिक्षिका शर्वरी करगुटकर, उपशिक्षक चंद्रशेखर पेटकर, संजया पावसकर ,ऐश्वर्या गुरव आदींनी बहुमोल परिश्रम घेतले.. हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मंगेश म्हादये , सर्व ग्रामस्थ, पालक यांच्याकडून सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg