loader
Breaking News
Breaking News
Foto

काडवली येथे स्टोन क्रशरवर मोठी चोरी; २ लाख ८६ हजारांचा मुद्देमाल लंपास

खेड (वार्ताहर) : - तालुक्यातील काडवली येथे स्टोनक्रशरवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यानेच तब्बल २लाख ८६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही चोरी १८ नोव्हेंबर सकाळी ९:३० या वेळेत घडली असून तक्रार मात्र २६ नोव्हेंबर २०२५ रोजी दाखल करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

फिर्यादी प्रथमराव रविंद्र पालांडे देशमुख (वय ३२), रा. धामणंद, बस स्टॉपजवळ, ता. खेड, यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या मालकीच्या स्टोन क्रशरवर काम करणारा शाहरूख (पूर्ण नाव व पत्ता अज्ञात) या कामगारानेच क्रशरवरील विविध साहित्य चोरी करून पसार झाला आहे. चोरी गेलेला मुद्देमालमध्ये ४ हजार किमतीचे २ चॉकलेटी रंगाचे ओरिएंट कंपनीचे सिलिंग फॅन , ३ हजार किमतीच्या २ पांढऱ्या रंगाच्या एमसीबी लाईट (प्रत्येकी १५००), ३२ हजार किमतीच्या पॉलीकॅब कंपनीच्या १६ इलेक्ट्रिक वायर बंडल (प्रत्येकी २ हजार) , ५ हजार किमतीची पिवळ्या रंगाची ग्राइंडर मशीन , १२ हजार किमतीचे २ पिवळ्या रंगाचे स्पॅनर बॉक्स सेट (प्रत्येकी ६हजार), ८० हजार किमतीची क्रशर मशीनच्या कन्वेयर बेल्टची १६ बेअरिंग (प्रत्येकी ५ हजार), १ लाख ५० हजार किमतीचा पोकलेन मशीनच्या इंजिन पार्टमधील हायड्रॉलिक पंप असा मुद्देमाल चोरीस गेला आहे. याप्रकरणी शाहरूख नामक व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास खेड पोलिसांकडून सुरू आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg