वरवेली (गणेश किर्वे) - नगराध्यक्ष पदाची खुर्ची मिळाल्यानंतर तिथे पक्ष नसणार आहे, त्यामुळे त्या खुर्चीवर बसल्यानंतर गुहागर शहराचा फक्त विकासच केला जाईल त्यामध्ये कुठलेही पक्षीय राजकारण केले जाणार नाही याची विशेष काळजी घेतली जाईल, गुहागरतील जनतेने माझ्यावर विश्वास ठेवा... आम्ही प्रामाणिकपणे काम करू... सर्व विकासकामे चांगल्या दर्जाची करू ...कोणाची गैरसोय व तक्रार होईल असे काम माझ्याकडून होणार नसल्याची ग्वाही गुहागर नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवार निता विकास मालप यांनी दिली.
त्या पुढे म्हणाल्या की, नगराध्यक्ष पदाची निवडणूक आम्ही जिंकणार आहोत, जिंकून आल्यानंतर शहरातील रस्ते सुधारून येथील स्ट्रीटलाईटची सुविधा पूर्ण करून घेऊन पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात नागरिकांच्या काही अडीअडचणी असतील त्याचे निवारण केले जाईल. गुहागर शहरातील अंगणवाड्या, शाळा यांचा दर्जा सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. मागील काही झालेल्या चुका पुन्हा नगरपंचायतमध्ये होणार नाही याची विशेष काळजी घेतली जाईल, चांगल्या प्रकारे योजना राबविल्या जातील, महिला सक्षमीकरण व पर्यटन वाढीसाठी प्रयत्न केले जातील. पर्यटन स्थळे सुधारून त्या ठिकाणी रोजगार कसा मिळवता येईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे. गुहागर पोलीस परेड ग्राउंड येथील खोके धारकांच्या रोजगाराचा व मुलांचे खेळाचे मैदान या दोन्ही बाबतीत वरिष्ठांकडून याची पूर्ण माहिती घेऊनच योग्य तो निर्णय घेऊ असे सांगितले.
नगराध्यक्ष पदाच्या समोरील उमेदवारांचे आपणास आव्हान असणार आहे का? या प्रश्नावर बोलताना नीता मालप यांनी सांगितले की, माझ्यासमोर उभ्या असलेल्या दोघी उमेदवार माझ्या मैत्रिणीसारख्या आहेत, या सर्वांना मी ओळखते, या दोघींच्या निवडणुकीचे फॉर्म देखील आम्हीच भरले होते, या सर्व गोष्टी आम्ही एकमेकाला शेअर करूनच केल्या होत्या आणि आता जरी त्या जिंकल्या तरी मला आनंदच होईल. त्या नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीत बसल्या काय... मी बसले काय... आपलाच माणूस बसणार आहे... आपल्या शहरासाठी सर्वजण चांगलेच काम करणार आहेत.... माझ्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार अर्ज भरताना त्यांनाही खूप आनंद झाला होता, त्यांनी मलाही नगराध्यक्ष पदाच्या शुभेच्छा दिल्या होत्या, आम्ही सुरुवातीपासून एकमेकीना चांगले ओळखतो त्यामुळे ही निवडणुकीची लढत आमच्या मैत्रिणींमध्ये मैत्रीपूर्ण होईल असे सांगितले. सर्व वरिष्ठांचे सहकार्य मला पुढील काळात अपेक्षित आहे. माझ्या वाडीतील मंडळ माझ्यासाठी खंबीरपणे आज उभे आहे, राजकारणाचा अभ्यास मी अजून केला नाही.. वरिष्ठ मला पूर्णपणे कामकाज शिकवतील आणि ते शिकण्याची माझी पूर्ण तयारी आहे. पालकमंत्री उदय सामंत हे विजयी मिरवणुकीला गुहागरमध्ये येताना निधी घेऊन येईन असा शब्द दिला असून तो शब्द पालकमंत्री नक्कीच पाळणार आहेत. पालकमंत्री नेहमी आमच्या हाकेला धाव घेत असतात, त्यांनी दिलेले शब्द ते पाळत असतात, असे त्या म्हणाल्या.






































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.