दापोली (प्रतिनिधी) - आसुद येथील त्रिवेणी संगम ग्रुपच्या माध्यमातून विविध प्रकारचे उपक्रम हे सामाजिक बांधिलकीच्या न्यायाने दरवर्षी राबवले जातात. त्याप्रमाणे आसुद ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील आंबवली खुर्द या जिल्हा परिषद शाळेत ज्ञानदानाचे धडे गिरवणा-या आराध्या अनिल शिगवण या विद्यार्थ्यांनीला सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेंतर्गत दत्तक घेऊन तिला आर्थिक मदत करत त्रिवेणी संगम ग्रुपने आपले शैक्षणिक क्षेत्रातील एक महत्त्वाचे काम पार पाडले.
आंबवली खुर्द या जिल्हा परिषद शाळेत सावित्रीबाई फुले दत्तक योजनेअंतर्गत एक मुलगी दत्तक घेण्याचा कार्यक्रम त्रिवेणी संगम ग्रुपचे अध्यक्ष नंदकुमार बांद्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका नेहा सामंत, त्रिवेणी संगम ग्रुपच्या महिला अध्यक्षा समृध्दी रेवाळे, दिलिप बांद्रे, आंबवली खुर्द गावच्या पोलिस पाटील आणि त्रिवेणी संगम ग्रुप या सदस्या सौ.रोशनी बडबे, आशा सेविका आणि त्रिवेणी संगम ग्रुपच्या सदस्या सौ.सपना बडबे, सदस्य कमलाकर घडशे, प्रकाश शिर्के, बचटगट सी.आर.पी.सौ.विनया बांद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
दापोली तालुक्यातील आसुद येथील त्रिवेणी संगमग्रुप हा सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रिडा, आरोग्य विषयक मोफत उपचार व मार्गदर्शन शिबिरे आदी विविध प्रकारच्या समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करणारा आणि सातत्य राखणारा तालूक्यातील एकमेव असा ग्रुप आहे. अशा ग्रुपकडून ग्रुपचे अध्यक्ष नंदकुमार बांद्रे यांच्या कल्पक नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली सर्व सदस्यांच्या एकोप्याने दरवर्षी वर्षभरात स्वखर्चाने विविध उपक्रम राबवले जातात. यावर्षी या त्रिवेणी संगम ग्रुपने आसुद बाग येथील स्मशानभूमीची साफसफाई करून स्वच्छता केली तसेच स्मशानभूमीत बसायला बाकडे उपलब्ध करून दिले. सालदुरे शाळेतील तीन स्वच्छतागृहांचे स्वखर्चाने दरवाजे बसून दिले. आसुद ग्रुप ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील आसुद या गावासह आंबवली खुर्द आणि सालदुरे गावातील जिल्हा परिषद शाळांमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम केला. विद्यार्थ्यांना वहयावाटप केले आहे. दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला. दहावी विज्ञान परिक्षेत राज्यात पहिली आलेल्या सिमा संतोष भुवड या विद्यार्थ्यांनीचा तसेच धावणे स्पर्धेत विविध ठिकाणी अव्वल ठरलेला सुनील रेवाळे या विद्यार्थ्यांला प्रोत्साहन म्हणून त्याचा सन्मान करण्यात आला. असा हा त्रिवेणी संगम ग्रुप आपली सामाजिक बांधिलकी जपण्याचे मोठे काम करत आहे.

























































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.