loader
Breaking News
Breaking News
Foto

झोंबडी काजळीवाडी येथील पिण्याच्या पाण्याच्या विहिरीमध्ये कोल्हा

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील झोंबडी काजळीवाडी येथील पिण्याच्या पाण्याच्या विहिरीमध्ये एक कोल्हा पडून मरण पावलेला आढळून आला आहे. बराच काळ पाण्यात राहिल्यामुळे तो सडू लागला असून त्याला किडेही जंतू पडले आहेत. यामुळे विहिरीचे पाणी दूषित झाले असून परिसरात अत्यंत दुर्गंधी पसरली आहे. हे पाणी ग्रामस्थ पिण्यासाठी वापरत असल्यामुळे लोकांना ताप, उलट्या, जुलाब, पोटदुखीमुळे लोकांची प्रकृती चिंताजनक आहे. गंभीर आजारामुळे आरोग्यास धोका होईल असे भितीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यावेळी झोंबडी ग्रामपंचायतीच्या सरपंच अतुल लांजेकर, उपसरपंच प्रणाली पवार, सदस्या मयुरी लांजेकर, ग्रामसेवक गोरख सोनवणे, दिपक गायकवाड, आशा साक्षी सरदेसाई यांनी घटनास्थळी जाऊन लोकांची त्वरित काळजीपूर्वक दक्षता घेतली. व वाडीतील ग्रामस्थांना बरोबर घेऊन सुरक्षेच्या ऊपाय योजना ग्रामपंचायत मार्फत विहीरीतील पाणी स्वच्छतेची काम सुरू केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच गटविकास अधिकारी शेखर भिल्लांरे व कार्यकारी अभियंता दिप्ती धारप यांच्याशी संपर्क साधला आहे. त्यांनीही सहाय्यक अभियंता गिरीश पापरकर व पवार यांना पहाण्यासाठी घटनास्थळी आले होते. मृत कोल्हा विहीरीतुन बाहेर काढून टाकण्यात आला आहे. विहिरीची स्वच्छता, क्लोरिनेशन/निर्जंतुकीकरण आणि पाण्याची तपासणी करून घेण्यात येत आहे. तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. सुप्रीम कांबळे, आरोग्य केंद्र कळवली चे अधिकारी .वैभव जाधव, मदन जानवळकर यांना भेटून वाडीतील लोकांसाठी आरोग्य तपासणी कॅम्प लावण्यात आला आहे. सरपंच अतुल लांजेकर स्वत: उभे राहून लोकांची दक्षता घेत आहेत.

टाइम्स स्पेशल

याकामी सुरेश पालशेतकर, शैलेश सावर्डेकर, नंदेश सावर्डेकर, संतोष शिरकर, महेंद्र पालशेतकर, स्वप्नीलआंबोवकर, गणेश पालशेतकर, देवदास पालशेतकर, केशव शिरकर, आशिष सावर्डेकर, ऊत्कर्ष सेवा मंडळ सदस्य ग्रामस्थ सहकार्य करत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg