loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडमध्ये उद्या ३० रोजी संविधान रॅलीचे आयोजन

खेड - खेड तालुका बौद्ध कर्मचारी संघटनेच्यावतीने संविधान दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त रविवार ३० नोव्हेंबर रोजी खेड शहरातून संविधान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय संविधानाचे जतन व संवर्धन करणे हे प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य आहे. म्हणूनच या संविधानाचे महत्व जाणून घेऊन त्याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने खेड तालुका बौद्ध कर्मचारी संघटनेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष सुरेश तांबे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सकाळी ११ वाजता खेड बाजारपेठेतून संविधान जनजागृती रॅली निघणार असून तद्वंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन खेड येथे संविधान दिनानिमित्त व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. प्राध्यापक पी.आर.तांबे हे भारतीय संविधान या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच विविध सामाजिक संघटना व विविध कर्मचारी संघटना या रॅलीत सहभागी होणार असून आपण सर्व नागरिकांनी सदर कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन संघटनेच्या वतीन करण्यात येत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg