loader
Breaking News
Breaking News
Foto

राज्य मल्लखांब स्पर्धेचा पहिला दिवस गाजवला मुंबई व नाशिकच्या खेळाडूंनी

वरवेली (गणेश किर्वे) - रत्नागिरी जिल्हा मल्लखांब संघटनेच्या आयोजनाखाली ४१व्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद मल्लखांब स्पर्धा डेरवण क्रीडा संकुलामध्ये दि. २८ ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत सुरू आहेत. पहिल्या दिवशी १८ वर्षावरील मुलगे व १६ वर्षावरील मुली या दोन वयोगटाच्या स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत मुंबई उपनगर व नाशिकच्या खेळाडूंनी आपले वर्चस्व दाखवले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पहिल्या दिवसाच्या सविस्तर निकाल खालील प्रमाणे - मुलगे - पुरलेला मल्लखांब - सुवर्ण पदक - रणवीर मोहिते (रत्नागिरी), रौप्य पदक - अथर्व कोंडविलकर (मुंबई शहर), कांस्य पदक - अभिषेक प्रसाद (मुंबई उपनगर). दोरीचा मलखांब - सुवर्ण पदक - शार्दुल ऋषिकेश (मुंबई उपनगर), रौप्य पदक - कृष्णा आंबेकर (नाशिक), कांस्य पदक - अथर्व कोंडविलकर (मुंबई शहर). टांगता मल्लखांब - सुवर्ण पदक - कृष्णा आंबेकर (नाशिक), रौप्य पदक - दर्शन मणियार (सातारा), कांस्य पदक - वेदांत शिंदे (सातारा). वैयक्तिक विजेतेपद - सुवर्ण पदक - कृष्णा आंबेकर (नाशिक), रौप्य पदक - शार्दुल ऋषिकेश (मुंबई उपनगर), कांस्य पदक - अथर्व कोंडविलकर (मुंबई शहर).

टाइम्स स्पेशल

मुली - पुरलेला मल्लखांब - सुवर्ण पदक - निष्ठा फाटक (मुंबई उपनगर), रौप्य पदक - पलक चुरी (मुंबई उपनगर), कांस्य पदक - सई शिंदे (सातारा). दोरीचा मल्लखांब - सुवर्ण पदक - भक्ती मोरे (सातारा), रौप्य पदक - पलक चुरी (मुंबई उपनगर), कांस्य पदक - वैष्णवी पवार (नाशिक). वैयक्तिक विजेतेपद - सुवर्ण पदक - पलक चुरी (मुंबई उपनगर), रौप्य पदक - मोरे (सातारा), कांस्य पदक - फाटक (मुंबई उपनगर) या सर्व खेळाडूंना रत्नागिरी जिल्हा मल्लखांब संघटनेचे अध्यक्ष सुधाकर काळे, माधव टिकेकर यांनी बक्षीस देऊन सन्मानित केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg