सावंतवाडी (प्रतिनिधी) - सौदी अरेबियाच्या पूर्व प्रांतातील अल जुबैल शहरात 'मराठी मंडळ जुबैल' यांच्या वतीने नुकताच दिवाळी विशेष कार्यक्रम अत्यंत उत्साहात संपन्न झाला. महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा परदेशातही जिवंत ठेवण्यासाठी हे मंडळ गेली अनेक वर्षे कार्यरत आहे, आणि याच ध्येयाने त्यांनी विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन केले होते. महाराष्ट्रातील सण-उत्सवांचे महत्त्व नव्या पिढीला कळावे आणि आपल्या समृद्ध संस्कृतीचे जतन व्हावे, या उद्देशाने मंडळाने दिवाळी सणानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमांमध्ये लहान मुलांनी आणि बालगोपाळांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला.
श्लोक, स्तोत्र, प्रार्थना पठण स्पर्धा, मराठी भक्ती गीत गायन स्पर्धा, वाद्य वादन स्पर्धा, वेषभूषा स्पर्धा, नृत्य स्पर्धा, सामान्य ज्ञान वाढवणारी प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. या कार्यक्रमादरम्यान आयोजित केलेल्या विविध स्पर्धांमध्ये मराठी मुलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यामध्ये, वाद्य वादन स्पर्धेत ईशान योगिता अमर गावडे याने प्रथम पारितोषिक पटकावून आपले संगीत कौशल्य सिद्ध केले. ईशान याने समूह गीत आणि समूह वाद्य वादनासोबतच गायन स्पर्धा व वाद्य वादन स्पर्धेत सहभाग घेतला होता. गायन स्पर्धेत त्याने "टाळ वाजे चिपळीला नाच माझ्या संग" हे भजन तर वाद्य वादन स्पर्धेत पियानोवर "अभिर गुलाल उधळीत रंग" हे भजन सादर केले.
परदेशात राहूनही शास्त्रीय संगीतातील त्याचे प्राविण्य पाहून येथील रहिवाशांनी त्याचे विशेष कौतुक केले. या अद्भुत कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रत्येक कार्यक्रम समन्वयक, स्वयंसेवक, सर्व स्पर्धक, कलाकार, सहाय्यक कर्मचारी आणि बॅकस्टेज कलाकारांचे मोठे योगदान लाभले. तसेच, स्वेता मठकर व अभिजीत मठकर यांच्या प्रभावी आणि उत्स्फूर्त सूत्रसंचालनामुळे कार्यक्रमाला एक खास रंगत आली.






































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.