सिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे स्मार्ट डिजिटल क्लासरूम व नवनीत टॉप क्लास सॉफ्टवेअर उद्घाटन सोहळा सिंधुदुर्गचे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता अधिकारी माननीय सुरज बापूसो देबाजे यांचे शुभहस्ते पार पडला. याप्रसंगी सैनिक शाळेचे अध्यक्ष श्री सुनील राऊळ , सचिव जॉय डोंटस, सैनिक पतसंस्था चेअरमन बाबुराव कविटकर ,संचालक शिवाजी परब, सर्व संचालक मंडळ ,कार्यालयीन सचिव दीपक राऊळ, शाळेचे प्राचार्य नितीन गावडे, जिल्हा आरोग्य निरीक्षक गणेश जाधव, नितीन नाईक ,सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. आजच्या आधुनिक काळात डिजिटल क्लासरूम ही संकल्पना अतिशय परिणामकारक , प्रभावी परिवर्तनशील आणि आधुनिक काळाची नितांत गरज बनली आहे. ही गरज ओळखून संस्थेने संपूर्ण शाळा डिजिटल शाळा बनवण्याचा निर्धार केला.
संस्था, पालक आणि विद्यार्थी यांच्या एकत्रित लोकसहभागातून डिजिटल क्लासरूम ही संकल्पना सत्यात उतरली आणि आज स्मार्ट क्लासरूम आणि नवनीतचे टॉप क्लास सॉफ्टवेअर याचे औपचारिक उद्घाटन प्रमुख अतिथींच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले. इयत्ता सहावी ते बारावीपर्यंतच्या सात वर्गामध्ये डिजिटल बोर्ड कार्यान्वित करण्यात आलेले आहेत. हे सर्व स्मार्ट बोर्ड इंटरनेटने जोडलेले आहेत व यांचा उपयोग ऑनलाईन आणि ऑफलाइन अध्ययन-अध्यापन प्रक्रिया प्रभावी पणे करण्यासाठी केला जात आहे. सदर स्मार्ट बोर्ड मध्ये अत्याधुनिक असे नवनीत कंपनीचे टॉप क्लास सॉफ्टवेअर देखील घेण्यात आलेले आहे. या सॉफ्टवेअरचा उपयोग इयत्ता सहावी ते दहावीच्या सर्व वर्गांना प्रभावी अध्यापनासाठी होत असून विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमतेमध्ये भरीव वाढ होत आहे. दैनंदिन अध्यापनात खंड पडू नये म्हणून त्याला इन्व्हर्टर आणि जनरेटर चा बॅकअप देण्यात आलेला आहे. शिक्षकांनी सदर तंत्रज्ञानाचा अध्यापनात प्रभावी वापर करण्यासाठी सर्व शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आलेले असून अध्यापनात याचा प्रभावी वापर केला जात आहे संपूर्ण सैनिक शाळा ही सीसीटीव्हीच्या निरीक्षण कक्षेत कार्यान्वित करण्यात आलेली असून सर्व क्लासरूम, होस्टेल, भोजन कक्ष या ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात आले.
सर्व कॅम्पस सीसीटीव्ही आणि वाय-फाय ने जोडलेला आहे. शाळेकडे अत्याधुनिक संगणक प्रयोगशाळा असून त्याचाही प्रभावी वापर दैनंदिन अध्यापनात केला जात आहे. शाळेचे प्राचार्य नितीन गावडे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे महत्त्व स्पष्ट करून शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये मिळविलेल्या यशाचा आढावा घेतला आणि उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एच. बी. अडकुरकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी सर्व संचालक मंडळ, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि वसतिगृह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.