सावंतवाडी (प्रतिनिधी) - मतदारांना केंद्रबिंदू मानून नागरिकांचा विकास हाच एकमेव अजेंडा घेऊन भारतीय जनता पार्टी नगरपरिषद निवडणुकांना सामोरे जात आहे. ही निवडणूक केवळ विकासाच्या मुद्द्यावर लढवली जात असून, जिल्ह्यातील चारही नगरपरिषदेच्या निवडणुकांमध्ये भाजपचा विजय होऊन इतिहास घडणार, असा विश्वास राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला. सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखनराजे भोंसले, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, मंदार कल्याणकर आदी उपस्थित होते. सावंतवाडी राजघराण्याचे स्थान राजकारणापलीकडचे आहे. या घराण्याने शहरासाठी मोठे योगदान दिले आहे, ज्यामुळे आजची सावंतवाडी उभी आहे. राजघराणं ही सावंतवाडीची अस्मिता आहे. मात्र, या निवडणुकीत ज्या पद्धतीने राजघराण्यावर टीका केली जात आहे, ती निश्चितच योग्य नाही. "राजघराणं संपलं" असं म्हणणाऱ्यांना येथील नागरिक २ तारखेला मतदानातून उत्तर देतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राजघराण्याने निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्यावर मी स्वतः आमदार दीपक केसरकर यांच्याशी बोलून त्यांना राजघराण्याची भेट घेण्यास सांगितले होते. सावंतवाडीतील नगराध्यक्षपदाची जागा भाजपकडे होती, त्यामुळे आमच्या हक्काची जागा आम्ही कशी सोडायची, असा सवाल त्यांनी केला. युती का झाली नाही, याचे उत्तर ३ तारखेनंतर नक्कीच देऊ, उगाच कोणी गैरसमज पसरवू नये, असेही ते म्हणाले.जिल्ह्यातील रुग्णांना उपचारासाठी गोवा-बांबोळी येथे जावे लागते, तसेच युवक-युवतींना रोजगारासाठी गोव्यात जावे लागते, हे मला आवडत नाही. त्यामुळे आगामी ४ वर्षांत आरोग्याचा हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवणार आणि स्थानिकांना याच ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देणार, असा विश्वास पालकमंत्री राणे यांनी व्यक्त केला. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर शांतपणे निवडणुकीला सामोरे जात आहोत. कोणीही सावंतवाडीची शांतता बिघडवलेली नाही आणि पालकमंत्री म्हणून मी ती घडूही देणार नाही. विकासाबाबत अपयशी ठरलेल्यांनी केवळ राजकारणासाठी प्रत्येक निवडणुकीत तेच तेच मुद्दे उगाळून जनतेमध्ये गैरसमज निर्माण करणे योग्य नव्हे, असे ते म्हणाले.
मागील पोटनिवडणुकीत अल्प कालावधी आणि कोरोनामुळे अपेक्षित काम करता आले नाही. आज देशात आणि राज्यात आमची सत्ता आहे, मुख्यमंत्री आमचे आहेत, मी स्वतः पालकमंत्री आहे आणि खासदार नारायण राणे सोबत आहेत. आमचा रोडमॅप तयार आहे. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार श्रद्धाराजे भोंसले यांच्याकडे विकासाचे व्हिजन आहे. त्यामुळे जनतेने भाजपला साथ दिल्यास, पुढील ५ वर्षांत श्रद्धाराजेंच्या नेतृत्वात सावंतवाडीकरांचा सर्वांगीण विकास करण्याची ग्वाही त्यांनी दिली. केसरकरांवर पलटवार करताना ते म्हणाले, "भारतीय जनता पार्टीत खासदार नारायण राणे यांचे खच्चीकरण होत आहे," असे आमदार दीपक केसरकर म्हणत असतील, तर ते केवळ हास्यास्पद आहे. २०१४ पासून २०२४ पर्यंत कथित दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करून राणेसाहेबांना आणि राणे कुटुंबाला सर्वाधिक त्रास कोणी दिला, हे येथील जनतेला माहीत आहे. पालकमंत्री राणे म्हणाले, "भारतीय जनता पार्टीने राणे साहेबांना मोठा मानसन्मान दिला. राज्यसभा खासदार, केंद्रीय मंत्री व आता लोकसभा खासदार ही पदं भाजपनेच राणे साहेबांना देऊन त्यांना ताकद देण्याचे काम केले. उगाच कोणी गैरसमज पसरवून आमच्या नेत्यांवर टीका करू नये." निवडणूक सोपी न घेता पूर्ण ताकद लावून लढत आहोत. विकासाच्या मुद्द्यावर मतदारांनी योग्य निर्णय घ्यावा आणि चारही नगरपरिषदांमध्ये भाजपचाच विजय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.




















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.