loader
Breaking News
Breaking News
Foto

राजापूरात प्रचारात आघाडीची मुसंडी, हुस्नबानू खलिफेंचा एकतर्फी विजय निश्‍चित

राजापूर - राजापूर नगरपरिषदेची निवडणुक आघाडी आणि युती यामध्ये होत असून आघाडीच्या प्रचाराने मुसंडी घेतली आहे. गेल्या २४ तासात राजापूरचे राजकीय चित्र पालटून गेले आहे. महिला व तरुणवर्गाचा कल आघाडीच्या दिशेने वळला असल्याने माजी आमदार आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार हुस्नबानू खलिफे यांचा विजय एकतर्फी असल्याचे आता बोलले जात आहे. मतदार नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला मतदान करताना आपल्या शहराच्या विकासाबाबत कोणाकडे चांगले व्हिजन असेल आणि शासकीय योेजनांची माहिती असलेले अनुभवी नेतृत्व कोण आहे? याचा सारासार विचार मतदार करीत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

राजापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीचा कानोसा घेता दोन दिवसांपूर्वी असलेले राजकीय चित्र अचानक पालटून गेले आहे. शहराच्या मुख्य बाजारपेठेत आघाडीने पूर्ण प्राबल्य निर्माण केले आहे. आघाडीचे उमेदवार सरस ठरत आहेत. नगरपरिषदेच्या पूर्ण कार्यक्षेत्रात आघाडीच्या सर्वच उमेदवारांनी प्रचारात मुसंडी घेतल्याने त्याचा फायदा कॉंग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार हुस्नबानू खलिफे यांना होताना दिसत आहे. राजकारणात स्वच्छ प्रतिमा असलेल्या आणि ज्यांच्याकडे विकासाचे व्हिजन आहे, अशा खलिफे असल्याने सुशिक्षित मतदारांतून मोठे पाठबळ त्यांना लाभले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg