रत्नागिरी - शहरानजीकच्या कसोप येथील सर्वंकष विद्या मंदिरमध्ये विद्यार्ध्यांच्या विविध कला- गुणांचे प्रदर्शन अर्थात वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम अतिशय दिमाखात पार पडला. दोन दिवसांच्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी ‘भारत २. ०’ ची झलक नाविन्यपूर्ण ढंगात प्रस्तुत करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. गुरुवार दि. २७ रोजी मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी रत्नागिरी तटरक्षक दलाचे कमांडिंग ऑफिसर श्री. उपाध्याय, श्री. गुप्ता, जिल्हा पोलीस अधिक्षक श्री. नितीन बगाटे, सर्वंकष विद्या मंदिर, रत्नागिरीचे चेअरमन श्री. अर्जुन गद्रे, ट्रस्टी उद्योजक श्री. दीपक गद्रे, मीना गद्रे, जि. प. अधिकारी श्री. परीक्षित यादव, सीमा यादव, प्रशालेच्या मुख्याध्यापिका मोनिका जैस्वाल, वरिष्ठ पर्यवेक्षिका झेबा परकार आदी मान्यवर उपस्थित होते.
दोन दिवस रंगलेल्या या कार्यक्रमाची थीम 'भारत २. ०' अशी होती. भारताच्या प्राचीन थोर परंपरांपासून आताच्या बलशाली आधुनिक भारतापर्यंतचा प्रवास विद्यार्थ्यांनी आपल्या सुंदर कलाविष्काराने दाखवला. दि. २७ नोव्हें.ला प्री प्रायमरी ते इयत्ता ४थी च्या मुलांचे कार्यक्रम झाले. प्रार्थना नृत्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर प्री प्रायमरीच्या मुलांनी नवीन वर्ष स्वागत व हार्वेस्टिंग उत्सव या थीमवर नृत्याविष्कार सादर केला. गुरुकुल ते ग्लोबल एज्युकेशन हे स्किट अनेकांच्या कौतुकास पात्र ठरले. त्यानंतर संरक्षण दलाला मानवंदना देणारा नृत्याविष्कार सादर झाला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या भारतीय खाद्य संस्कृतीचा गमतीदार प्रवास व भारतीय सिनेमाच्या इतिहासाने तर धमाल उडवून दिली. दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाची सुरुवात तारे भगिनींच्या अप्रतिम अशा जिमन्यास्टिक नृत्य प्रकाराने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सुमधुर आवाजात ट्रेन जर्नी सादर केली. ६ वीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला आर्यव्रत ते भारत हा प्रवास डोळ्यात साठवून ठेवावा असाच होता. ५वीच्या विद्यार्थ्यांनी इसरोचा प्रवास शॅडो ऍक्ट व नृत्याच्या साहाय्याने सादर केला. इयत्ता ७वी व ८ वीच्या विद्यार्थ्यांनी वैद्यकीय क्षेत्राचा सुंदर आढावा घेतला. ९वी व १०वीच्या विद्यार्थ्यांनी संरक्षण दलाला मानवंदना देताना चाफेकर बंधू ते ऑपरेशन सिंदूर पर्यंतच्या आठवणी जिवंत केल्या. ११वी व १२वीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमातील सायन्स व टेकनॉलॉजिचे महत्व रोबोटच्या साहाय्याने रंजक पद्धतीने दाखविले. ९वीच्या विद्यार्थिनींनी स्त्री शक्तीचा जागर अप्रतिम अशा नृत्याविष्काराने सादर केला. कार्यक्रमाची सांगता बलशाली भारताला संगीतमय मानवंदना देऊन करण्यात आली.
रत्नागिरीचे पालकमंत्री नाम. उदय सामंत यांनी आपल्या व्यस्त दिनक्रमातून थोडा वेळ काढून एसव्हीएमच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला आवर्जून भेट दिली व विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. आपल्या वेळी अशी शाळा नसल्याची खंत व्यक्त करतानाच एसव्हीएमच्या उपक्रमांचे त्यांनी भरभरून कौतुक केले. शालेय वार्षिक अहवालाचे वाचन प्रशालेच्या मुख्याध्यापिका मोनिका जैस्वाल, वरिष्ठ पर्यवेक्षिका झेबा परकार व मराठी भाषा विभाग प्रमुख सुमित देवस्थळी यांनी केले. कार्यक्रमासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.






































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.