loader
Breaking News
Breaking News
Foto

वेळणेश्वर जिल्हा परिषद गटा मध्ये नेत्रा ठाकुर यांचा विकास कामांचा धडाका

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - गुहागर तालुक्यातील गटामध्ये विकास कामांचा धडाका सुरू आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या निधीतून मंजूर झालेल्या कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद गटाच्या माजी जि.प.सदस्य नेत्राताई ठाकूर यांच्या हस्ते संपन्न झाले. चिंद्रावळे सल्पेवाडी, गावडेवाडी, गराटेवाडी स्मशानभूमीच्या रस्त्याचे भूमिपूजन या कामासाठी निधी ५ लाख रुपये मंजूर. चिद्रावळे मधलीवाडी, डाफलेवाडी पडगळ स्मशानभूमीच्या रस्त्याचे डांबरीकरण भूमिपूजन निधी या कामाकरता १० हा लाख रुपये निधी मंजूर. दोडवली अंगणवाडी इमारत बांधणे ११.२५ हजार, दोडवली कालमवाडी देऊळवाडी रस्त्याचे भूमिपूजन ६ लक्ष रुपये निधी मंजूर झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सर्व निधी रत्नागिरी जिल्ह्यांचे पालकमंत्री उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या फंडातून देण्यात आला. सर्व कामाचे भुमिपुजन नेत्राताई नवनीत ठाकूर यांचे शुभहस्ते करण्यात आले. हा निधी आण्यासाठी नेत्राताई ठाकूर यांनी विषेश प्रयत्न केले. या कार्यक्रमाला उपस्थित विलास वाघे मा.सभापती, दत्ताराम निकम, संदीप गोरीवले, जोस्नाताई काताळकर, समीर जी डिगणकर, शिवसेना शाखाप्रमुख बबनराव ठीक, बुथप्रमुख संदीप डांफले, अनंत पवार, बबन कांबळे मुंबई ग्रा मंडळ अध्यक्ष दोडवली,तेजस पांगडे, महेश डिगणकर, भागोजी सोलकर मुंबई अध्यक्ष चिद्रावळे संतोष ठीक, गंगाराम डाफले आदि उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg