loader
Breaking News
Breaking News
Foto

भारतीय मानवधिकार असोसिएशन संघटनेतर्फे संविधान दिन साजरा

रत्नागिरी : ७६ वा संविधान वर्धापन दिन भारत सरकार नीती आयोग संचालित भारतीय मानवधिकार असोसिएशन संघटनेतर्फे विविध राज्यात साजरा झाला. याच संघटनेच्या महाराष्ट्र राज्य संघटकानी पूर्ण प्राथमिक शाळा, कासारवेली,रत्नागिरी येथे हा संविधान गौरव दिन कार्यक्रम आयोजित केला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमाची सुरुवात करण्यापूर्वी सिव्हिल हॉस्पिटल,रत्नागिरी येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सकाळी ९.३० वाजता जाऊन त्यांना पुष्पमाळा अर्पण केल्या. तसेच मारुती मंदिर रत्नागिरी येथील महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ सकाळी १०.०० वाजता जाऊन त्यांनाही पुष्यमाला अर्पण केल्या. त्यावेळी उपस्थितांमध्ये राज्य प्रशासकीय संरक्षण समितीचे राज्य प्रमुख गजानन लाड, कोकण विभागीय पोलीस संरक्षण समितीचे उप सर्वोच्च प्रणेश मयेकर, कोकण विभागीय आर्थिक संरक्षण समितीचे उप सर्वोच्च शौकत गोलंदाज, रत्नागिरी जिल्हा पोलीस संरक्षण समितीचे जिल्हाप्रमुख दीपक कीर तसेच प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले माजी केंद्रप्रमुख अरुण जाधव उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

याप्रसंगी सर्व उपस्थित पदाधिकारी व सदस्यांनी घटना संविधान शपथ घेतली व संविधाना बाबत घोषणा केल्या. त्यानंतर सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी पूर्ण प्राथमिक शाळा कासारवेली रत्नागिरी येथे पुढील कार्यक्रम सुरू करण्यासाठी रवाना झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg