संगमेश्वर (सत्यवान विचारे) - संगमेश्वर तालुक्यातील उंबरे (बसवनकरवाडी) यांनी आमदार शेखर निकम यांच्या लोकाभिमुख, विकासाभिमुख आणि पारदर्शक कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत मुंबई मंडळ व स्थानिक मंडळातील ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट) मध्ये जाहीर प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा आमदार शेखर निकम यांच्या जनसंपर्क कार्यालय, सावर्डे येथे मोठ्या उत्साहात पार पडला. मुंबई मंडळ सदस्य प्रमोद बसवनकर, अध्यक्ष संतोष बसवनकर, कार्याध्यक्ष विश्वनाथ बसवनकर, युवा अध्यक्ष मंगेश घाटकर, कार्याध्यक्ष दीपक बसवनकर, आत्माराम बाईत, विलास बाईत, प्रदीप बसवनकर, माजी सरपंच तुकाराम बाईत, बेंडू बसवनकर, महेश बसवनकर, उदय शिंदे, सुरेश घाटकर, चंद्रकांत बसवनकर, प्रकाश बसवंतकर, उंबरे गावकर बसवणकर गुरुजी, संजय बसवणकर आणि सचिन बसवणकर यांसह अनेक ग्रामस्थांनी विश्वासाचा हात पुढे करत पक्ष प्रवेश केला.
या प्रवेशासाठी बाळू इंदुलकर, मंगेश सुर्वे व गौरव सुर्वे यांनी विशेष मेहनत घेत ग्रामस्थांमध्ये संवाद साधत पक्षाच्या कार्याचा व निकम साहेबांच्या विकासदृष्टीचा वेध दिला. आमदार शेखर निकम यांच्या नेतृत्वाखाली संगमेश्वर-चिपळूण मतदार संघात झालेले रस्त्यांचे व्यापक जाळे, पाणीपुरवठा योजना, शैक्षणिक व आरोग्यविषयक सुविधांचा विस्तार, पर्यटन विकासाच्या दृष्टीने सुरू असलेली महत्त्वाकांक्षी कामे, तसेच युवकांना रोजगारसंधी उपलब्ध करून देण्यासाठी घेतलेली पुढाकार यामुळे सामान्य नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे. याच विश्वासाची पुष्टी म्हणून ग्रामस्थांचा आजचा भव्य प्रवेश सोहळा सावर्डे येथील जनसंपर्क कार्यालय गजबजून गेला.
यावेळी विजय गुजर, दशरथ दाभोलकर, मजीद नेवरेकर, अकबर दसुरकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उंबरे ग्रामस्थांचा पक्षप्रवेश हा विकासाच्या दिशेने उभारलेला नवा मैलाचा दगड ठरल्याची भावना उपस्थितांच्या चेहऱ्यावर दिसून आली.



























































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.