loader
Breaking News
Breaking News
Foto

सुरळ येथील श्री वाघजाई देवी, काळकाई देवी मंदिरात वार्षिक गोंधळ

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील सुरळ येथील श्री वाघजाई देवी, काळकाई देवी मंदिर देऊळ कमिटी आणि ग्रामस्थ मंडळाच्या वतीने श्री वाघजाई देवी, काळकाई देवीच्या मंदिरामध्ये वार्षिक गोंधळ कार्यक्रम संपन्न झाला. ग्राम देवीचा गोंधळमध्ये एक पारंपरिक लोक परंपरा आहे, गोंधळींनी देवीच्या नावाचा जयजयकार करत गाणी गायिली. संबळ व तुणतुणे यासारख्या वाद्यांचा वापर करत देवीच्या नावाचा जयघोष करण्यात आला. गोंधळ माध्यमातून देवीची उपासना करण्यात आली. देवीच्या विविध रूपांचे आणि कथांची यावेळी गोंधळी मंडळीने गाणी सादर केली. गावातील सर्व लहान थोर मंडळी, मुंबई व गावाच्या बाहेर राहणारी मंडळी, माहेर वाशिनी यांना ग्रामदेवतेचा सतत आशीर्वाद मिळावा व त्यांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी श्रद्धेने देवीचा गोंधळ घातला जातो. ग्रामदेवतेच्या मंदिरातील गोंधळ कार्यक्रमासाठी ग्रामस्थ, मित्रपरिवार तसेच मुंबईकर सहभागी झाले. यावेळी सर्वांनी दिवटी नाचविण्याचा आनंद घेतला. त्यानंतर देवीच्या महाप्रसादाचा सर्वांनी लाभ घेतला. या कार्यक्रमासाठी सुरळ येथील श्री वाघजाई देवी, श्री काळकाई देवी मंदिर देऊळ कमिटी आणि ग्रामस्थ मंडळाने विशेष मेहनत घेतली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg