मालवण (वार्ताहर) :- ‘‘इलाका किसका भी हो, धमाका निलेश राणेही करेगा’’ असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निलेश राणे यांना शिवसेनेचे ‘खणखणीत नाणे’ असे संबोधत मालवणच्या निवडणुकीत शिवसेनेचे सर्व उमेदवार प्रचंड मतांनी विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला. आपल्या भाषणात एकनाथ शिंदेंनी नाव न घेता अनेकांना टोले लगावताना आ. निलेश राणे यांचे भरभरुन कौतुक केले. यावेळी शिंदेंनी जोरदार फटकेबाजी करत काहींना नाव न घेता टोले लगावले. मालवण नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर प्रचार सभा मालवण येथील टोपीवाला हायस्कुलच्या मैदानावर सायंकाळी संपन्न झाली. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार निलेश राणे यांच्यासह अनेक पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं शिवप्रतिमा भेट देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आमदार निलेश राणे म्हणजे शिवसेनेची भगवी रेष आहेत. शिवसेनेचे खणखणीत नाणे आहेत. नारायण राणे यांचे बाळकडू त्यांना मिळाले आहे. त्यामुळे निलेश राणे हे घाबरणारे नाहीत. चांगल काम करताना कधी घाबरायचं नाही. मी पण कधी घाबरलो नाही, डॉक्टर नसताना सुद्धा मी अनेक ऑपरेशन केली आहेत, आम. निलेश राणे यांची या मतदार संघांसाठी काम करण्याची तळमळ आहे, प्रामाणिकपणा आहे, त्यांनी केलेले काम आपल्या समोर आहे. निलेश मी तुझ्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे, घाबरू नकोस, तू कोकणचा खर्या शिवसेनेचा हिरा आहेस असंच चांगलं काम करत राहा. पराभव दिसायला लागला की अनेकांचे दशावतार सुरु होतात, असे ना. शिंदे यांनी सांगत आम. राणे यांच्या कार्याचे कौतुक करतानाच विरोधकांनाही चिमटे काढले.
ना. शिंदे म्हणाले की, आमचे मित्रपक्ष म्हणून आपण लोकसभा निवडणुकीत मोदीसाठी आणि विधानसभेत महायुतीसाठी प्रामाणिकपणे काम केले. आमच्या कामाची पोचपावती दिली. पैशापेक्षा माणसं आणि प्रेम किती कमावलं हे महत्त्वाचं आहे. असे ते म्हणाले. कोकणावर बाळासाहेब ठाकरे यांचं विशेष प्रेम होतं. या कोकणातील विकास प्रकल्प नारायण राणे यांच्या मुख्यमंत्री काळात आले. आता आपला उद्योगमंत्री उदय सामंत उद्योग वाढवत आहेत आणि तुमचं एक मत मालवणच्या भविष्याला ठरवणार आहे. माझ्या सोबत निलेश राणे हे मालवणच्या विकासासाठी काम करत आहेत. त्यांना भरघोस निधी दिला जाईल, हा एकनाथ घेणारा नाही, देणारा आहे. विकास आपल्याला मालवणच्या दारावर आणायचा आहे. त्यासाठी तुम्ही फक्त २ तारखेला धनुष्य बाणाला मतदान करा, पुढचा विकास मी करतो असे सांगत त्यांनी शिवसेनेला विजयी करण्याचे आवाहन करत सभा संपवली.

























































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.