loader
Breaking News
Breaking News
Foto

शेवटच्या श्‍वासापर्यंत एकनाथ शिंदेंसोबत राहणार मालवणचा विकास हाच ध्यास : आ. निलेश राणे

मालवण (प्रतिनिधी) - मालवणचा विकास हाच आपला ध्यास असून शेवटच्या श्‍वासापर्यंत आपण एकनाथ शिंदेंसोबत राहणार आहे, असे प्रतिपादन मालवण येथे पार पडलेल्या जाहीर सभेत आ. निलेश राणे यांनी केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण आणि मालवणची निवडणुक जास्त गाजतेय, त्याचे कारण काही वेगळ सांगायची गरज नाही. गेल्या दहा वर्षात मालवण कुडाळ मतदार संघाला काही मिळाले नाही. दहा वर्षाचा मोठा बॅकलॉग भरुन काढायचा आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते आहे. मालवण आणि कुडाळ शहरचा चेहरा मोहरा ना. शिंदे आपल्या खात्यामार्फत बदलू शकतात. मालवण शहराच्या विकासाचे आणि शहर नीटनेटके ठेवण्यासाठी व्हिजन डॉक्युमेंट आम्ही जनतेसमोर ठेवलेच आहे. दहा वर्षाचा बॅकलॉग ना. शिंदेच भरुन काढू शकतात. ना. शिंदे यांच्याकडे केलेली मागणी पॉझीटिव्ह होऊनच येते. म्हणूनच शहर विकाससाठी नगर विकास खात्याच्या मार्फत जे जे करता येईल ते मी ना. शिंदे यांच्यासमोर ठेवणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तीर्थक्षेत्र असलेल्या पंढरपूरला नगरोत्थानमधून सर्वात जास्त निधी मिळतो. मालवणात सर्वात जास्त पर्यटक येतात. त्यामुळे या भागालाही दहा - दहा कोटींचा निधी मिळावा अशी माझी ना. शिंदे यांच्याकडे मागणी आहे, ना. शिंदे यांनी आमच्यावर आशीर्वाद ठेवावा, मतदार संघाला जपण्यासाठी जो विकासनिधी देता येईल तो द्यावां, असेही निलेश राणे म्हणाले. मालवण नगरपालिकेसाठी आम्ही नवे चेहरे आणि निष्कलंक असे उमेदवार दिले आहेत. माझ्यावर टीका होत असली तरी हरकत नाही, आज मी कोणाची नावे घेणार नाही, मला शहरचा विकास करायचा आहे. किती जरी टीका झाली तरी येणार्‍या तीन तारीखला सर्वांचे टांगे पलटी होणार, हा ओव्हर कॉन्फिडन्स नाही तर गेले वर्षभर आम्ही चांगले काम केले आहे, म्हणूनच हा विश्वास आम्हाला आहे, असेही आम. निलेश राणे म्हणाले.

टाइम्स स्पेशल

गेली दहा वर्षे निलेश राणे कुठेतरी फेकला गेला होता, कोण विचारत नव्हते, लोकांनी ओवाळून टाकला होता, काहींनी आमदारकीचे तिकीट देतो असे सांगितले, मात्र नंतर ते कुठेच दिसले नाहीत. मात्र मला संधी देण्याची तयारी ना. एकनाथ शिंदे यांनी दाखवली. कुठेही गेलास तरी तुझे शंभर टक्के योगदान दे अशी शिकवण आणि आशीर्वाद मला नारायण राणे यांनी दिले आहेत. म्हणूनच शेवटच्या श्वासापर्यंत मी एकनाथ शिंदे यांच्या सोबत राहणार आहे. त्यांचा पीए बनून राहण्यासही मी तयार आहे, असेही आम. निलेश राणे म्हणाले. मागच्या काळात कोणी लुटालूट केली हे जनतेला माहित आहे. दहा वर्षात विधी मंडळाला कळलेच नाही की मालवण कुडाळ हा पण एक मतदार संघ आहे, मात्र आता मालवण कुडाळ साठी न्याय मागायचा आहे. म्हणूनच आज लोकांना गर्व वाटवा असे काम मी करत आहे. माझ्याकडून जिल्ह्याचा व या मतदार संघाचा अपमान मी कधी होऊ देणार नाही, येथील जनतेची मान झुकेल असे काम कधीही करणार नाही, तुम्हाला खिशात हात घालावा लागेल असे काम आमचे नगरसेवक करणार नाहीत, तसे झाले तर तुमच्यासमोर नाक घासेन, असेही आम. निलेश राणे म्हणाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg